Manoj Jarange Patil Hunger Strike Protest Mumbai  Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Maratha Aarakshan : महायुतीच्या मंत्र्याचा जरांगेंना जाहीर पाठिंबा, म्हणाले आरक्षण मिळालेच पाहिजे

Manoj Jarange Patil Hunger Strike Protest Mumbai: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे” – अशी ठाम भूमिका महायुती मंत्र्यांनी स्पष्ट केली आहे.

Namdeo Kumbhar

  • महायुती मंत्र्यांचा जरांगेंना पाठिंबा, मराठा आरक्षणाची लढाई अधिक तीव्र

  • भगवं वादळ मुंबईत दाखल, शिवेंद्रराजेंचा आरक्षणाला जाहीर पाठिंबा

  • जरांगेंच्या आंदोलनात महायुतीची एंट्री, मंत्री म्हणाले – “आरक्षण मिळालेच पाहिजे”

  • मराठा आरक्षणाच्या मागणीला राज्यभरातून वाढता पाठिंबा

मराठा समजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी भगवे वादळ मुंबईमध्ये दाखल झाले आहे. राज्यभरातून जरांगे पाटील आणि मराठा समजाला पाठिंबा मिळत आहे. विरोधातील आमदार-खासदारांसह आता सत्ताधारी पक्षातील आमदार, मंत्र्यांकडूनही जरांगेंच्या आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा दिला जात आहे. फडणवीस सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला आहे. साम टीव्हीसोबत बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मराठा आरक्षणाला पहिल्यापासूनच समर्थन आहे. आरक्षण मिळावे अशी भूमिका सुरुवातीपासूनच होती, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे. आरक्षणाच्या मुद्द्याला पहिल्यापासूनच माझं समर्थन आहे. आजसुद्धा आहे. आरक्षण मिळाले पाहिजे. कायम राहणार आहे. शेवटी आऱक्षण मिळाले पाहिजे, गरजू मराठा समजातील लोकं आहेत, त्यांना आरक्षण मिळावे ही आमची पहिल्यापासूनची इच्छा आहे.

मनोज जरांगे पाटील यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल झाले आहे. जरांगेंच्या आंदोलनाला महाराष्ट्रातील गावागावातून पाठींबा मिळत आहे. मुंबईमध्ये जिकडे तिकडे भगवं वादळ घोंघावत आहे. आझाद मैदाना मराठ्यांनी पूर्णपणे भरले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईमध्ये जल्लोषात आणि जंगी स्वागत करण्यात येणार आहे. आज सकाळी ९ वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील आंदोलनात सहभागी होणार आहेत. अटी-शर्थीसह मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाठिंबा दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात ‘भगवं वादळ’ मुंबईत दाखल झाले आहे. मुंबईतील आझाद मैदान मराठा समाजाने गजबजला आहे, जिकडे तिकडे भगवे झेंडे दिसत आहेत. राज्यभरातील अनेक आमदार-खासदारांकडून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. सत्ताधारी महायुतीतील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा आरक्षण मिळायलाच हवं असे म्हणत जाहीर पाठिंबा दिला आहे. “मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे”अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sahibzada Farhan AK- 47 celebration : मला लोकांची...; AK-47 सेलिब्रेशनवर फरहान काय म्हणाला?

Navratri 2025: नवरात्रीत या वस्तूंची करा खरेदी, घरात कधीच कशाचीही कमी पडणार नाही!

Maharashtra Live News Update: परभणी शहरासह जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस

Pachora Viral Video: ओ प्रकाश भाऊ, कुदो मत! पण पाटील काही ऐकेना; पूर आलेल्या नदीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची उडी

आम्ही एकत्रच! शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एकत्र; बॅनर पुण्यात, पण चर्चा महाराष्ट्रात | VIDEO

SCROLL FOR NEXT