Bachchu Kadu News Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : 'बच्चू कडू हे ज्येष्ठ नेते, लवकरच ते मंत्रीपदी दिसतील'

आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे ज्येष्ठ नेते आहेत, लवकरच ते मंत्रीपदी दिसतील, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

शिंदे-फडणवीस सरकारला (Eknath Shinde)  पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. रवी राणा यांच्या गंभीर आरोपामुळे बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे. आता या वादादरम्यान शिंदे गटातील ज्येष्ठ नेते दीपक केसरकर यांनी बच्चू कडूंबाबत मोठं विधान केलं आहे.

आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे ज्येष्ठ नेते आहेत, लवकरच ते मंत्रीपदी दिसतील, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात सुरू असलेल्या वादाबाबतही केसरकर यांनी भाष्य केलं आहे. बच्चू कडू यांच्या पक्षामध्ये दोन आमदार आहेत. त्यामुळे इतर आमदारांच्यावतीने ते बोलत असतील. त्यामधील वस्तुस्थिती मला माहिती नाही. असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

इतकंच नाही तर, दीपक केसरकर यांनी बच्चू कडू यांना सल्लाही दिला आहे. बच्चू कडू हे लवकरच मंत्रीपदी दिसतील,मात्र जी व्यक्ती मंत्री बनणार आहे, तिने थोडा संयमही बाळगला पाहिजे, असं मला वाटतं, असा सल्ला दीपक केसरकर यांनी दिला.

बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा  (Ravi Rana)  यांच्यातील वाद आता शिंगेला पोहचला आहे. रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे येत्या १ नोव्हेंबरपर्यंत द्यावेत. त्यांनी पुरावे न दिल्यास वेगळा निर्णय घेऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

इतकंच नाही तर माझ्यासोबत १२ आमदार आहे. असा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे शिंदे-फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढलेली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

SCROLL FOR NEXT