Maharashtra Mini Lockdown: राज्यात मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता? अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Mini Lockdown: राज्यात मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता? अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार

मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस मोठी भर पडत चाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये कोरोना (Corona) बाधितांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस मोठी भर पडत चाली आहे. यामुळे तातडीची पावले उचलण्याची आवश्यकता असून कठोर निर्बंध (restrictions) लावण्यात येणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भामध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, टास्क फोर्स आणि इतर अधिकाऱ्यांची एक बैठक सकाळी ९ वाजता पार पडणार आहे. या बैठकीमध्ये निर्बंध लावण्याच्या संदर्भात चर्चा होणार आहे.

हे देखील पहा-

नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून राज्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, ही आकडेवारी मोठ्या प्रमाणात धडकी भरवणारी आहे. त्यामुळे राज्यामध्ये आता कठोर निर्बंध लावण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच राज्यामध्ये मिनी लॉकडाऊन (Lockdown) लावण्याची चर्चा होत आहे. कोरोना बाधितांच्या आकडेवारीला रोखण्याकरिता राज्य सरकारकडून वेळीच निर्बंध लावणे आवश्यक ठरणार आहे. त्यासंदर्भात सकाळी ९ वाजेच्या सुमारास मंत्रालयामध्ये बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर इतर मंत्री, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आज होणाऱ्या बैठकीमध्ये कठोर निर्बंध लावण्याच्या संदर्भात चर्चा होणार आहे. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेच्या संदर्भात माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कळवण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच या कठोर निर्बंध लावण्याच्या संदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत. पुण्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक होताना दिसून येत आहे. पुण्यामध्ये मंगळवारी दिवसभरात तब्बल १ हजार १०४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सरकार सतर्क आहे. त्यांनी संकटाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या उपाययोजना आणि कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. या कठोर निर्बंधांपैकी एक म्हणजे पुण्यात आजपासून मास्कशिवाय कुणी फिरताना दिसले तर त्याला थेट ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच कुणी मास्क नसताना थुंकताना दिसले तर त्या व्यक्तीकडून थेट १ हजार रुपयांचा दंड घेतला जाणार आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi : शुभमन गिलमुळे शतक ठोकलं, आता त्याच्यासारखं द्विशतकही करणार, वैभव सूर्यवंशीनं पूर्ण प्लान सांगितला

Shravana Nakshatra : मकर राशीच्या व्यक्तींचे आयुष्य आणि श्रवण नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचे करियर जाणून घ्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप, ठाकरेंचे खासदार आणि आमदार महायुतीच्या संपर्कात? भाजपच्या संकटमोचकाचा दावा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

SCROLL FOR NEXT