घाटकोपरमध्ये दुचाकी मधून लाखोंची पेट्रोल चोरी!  जयश्री मोरे
मुंबई/पुणे

घाटकोपरमध्ये दुचाकी मधून लाखोंची पेट्रोल चोरी!

वाढती महागाई आणि गगनाला भिडलेले पेट्रोलचे दर अशात पेट्रोल चोरी ! मुंबईसह राज्यभरात पेट्रोल चोरीच्या घटना वाढल्या असून दुचाकी मालकांची यामुळे डोकेदुखी वाढली आहे.

जयश्री मोरे

मुंबई : घाटकोपरच्या असल्फा भाजी मार्केट परिसरातून गेल्या काही दिवसात दुचाकी मधून पेट्रोल चोरी करण्याचे प्रकार प्रमाणात घडत असल्याचे समोर आले आहे. बुधवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास हि पेट्रोल चोर टोळी असल्फा भाजी मार्केटमध्ये असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

हे देखील पहा -

या घटनेत तीन चोर हे मध्य रात्री एक स्कुटी जवळ येतात, तिथे एक जण येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवतो एक दुचाकी वर बसून आडोसा निर्माण करतो आणि तिसरा चोर हा स्कुटी मधून पेट्रोल काढून घेतो असे हे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून या मार्केट परिसरात रोज पाच ते दहा दुचाकी मधून पेट्रोल चोरी जाण्याचे प्रकार समोर येत आहेत.

पेट्रोल चोरी बाबत दुचाकीस्वार यांनी चोरी छोटी असल्याने पोलीस ठाण्यात तक्रार केलेल्या नाही. मात्र, आता पेट्रोल चे दर जसजसे वर गेले तसे ही पेट्रोल चोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. ही पेट्रोल चोर टोळी थोडे थोडे करून लाखोंचे पेट्रोल चोरी करू लागल्याने त्यांना बेड्या ठोकण्याची मागणी स्थानिक करीत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तिसरी माळ; तुळजापुरात भाविकांची मांदियाळी

Mint-Lemon Juice For Liver Health: लिव्हरच्या आरोग्यासाठी बेस्ट ड्रिंक, आठवड्यातून 2 वेळा प्यायल्यास होईल फायदा

Shardiya Navratri 2026 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी-नवमी कधी आहे? तिथीमुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

भाजप आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! SBI मध्ये नोकरीचं आमिष, नेमकं प्रकरण काय?

कोकणात उष्णतेची लाट! रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा, १४३ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT