shivsena leader milind narvekar and bjp leader narayan rane
shivsena leader milind narvekar and bjp leader narayan rane saam tv
मुंबई/पुणे

Shivsena: बॉय का?; नार्वेकरांनी राणेंना त्या फाेनची आठवण करुन देत विचारलं, 'वाजली का तुमच्या मेमरीची घंटी!

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (narayan rane) सेनेचे (shivsena) सचिव मिलिंद नार्वेकर (milind narvekar) यांच्यावर वैयक्तिकरित्या टीका करुन त्यांची मातोश्रीवरचा बॉय म्हणून अवहेलना केली हाेती. राणेंच्या या वक्तव्यावर नार्वेकरांनी त्यांना एका गाेष्टीची आठवण करुन देत वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी? असं प्रत्युत्तर दिलं आहे. (narayan rane latest marathi news)

राणेंनी (narayan rane) बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मिलिंद नार्वेकरांवर (milind narvekar) बाेचरी टीका केली. ते म्हणाले 'कोण ओ मिलिंद नार्वेकर?, पूर्वी मातोश्रीवर बॉयचे काम करायचे के काय?, हो, माझ्यासमोरचीच गोष्ट आहे. मी पाहिले आहे. बेल मारली की येस सर, काय आणू? असे म्हणणारा नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे.' राणे यांच्या या खोचक टिप्पणीला नार्वेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नार्वेकरांनी ट्विट (tweet) करत राणे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परवानगीसाठी किती वेळा दूरध्वनी केला याची आठवण करून दिली. नार्वेकर ट्विटमध्ये म्हणतात, ' बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून (uddhav thackeray) परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?' हे ट्विट करताना नार्वेकर राणेंना टॅग करायचे विसरलेले नाहीत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: भाविकांची प्रतिक्षा संपली! दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू

Pandharpur News: भाविकांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून सुरू होणार

Tharla Tar Mag: सुभेदार कुटुंबिय साजरा करणार सायली-अर्जुनचा लग्नाचा पहिला वाढदिवस; मालिकेचा नवीन प्रोमो आऊट

Special Report | फडणवीसांची अजित पवारांना जाहीर क्लिन चिट!

Delhi Politics: निवडणुकीपूर्वी दिल्लीत मोठी घडामोड; राघव चढ्ढा लंडनहून परताच घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, चर्चा गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT