Mhasala Shrivardhan Marg Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Accident : हृदयद्रावक! भावाच्या उत्तर कार्यासाठी गावी निघालेल्या जोडप्यावर काळाचा घाला; पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

Mhasala Shrivardhan Marg Accident News : म्हसळा-श्रीवर्धन मार्गावर भीषण दुचाकी अपघातात पनवेल येथील नरेश पाटील यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी गंभीर जखमी आहेत. उत्तरकार्याला जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.

Alisha Khedekar

  • म्हसळा-श्रीवर्धन मार्गावर भीषण दुचाकी अपघात

  • नरेश पाटील यांचा जागीच मृत्यू

  • पत्नी राजेश्री पाटील गंभीर जखमी

  • उत्तरकार्याला जात असताना घडली दुर्दैवी घटना

पनवेलहून भावाच्या उत्तर कार्यासाठी गावी निघालेल्या एका दांपत्यावर काळाने घातला आहे. म्हसळा श्रीवर्धन मार्गावर भीषण अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीची पत्नी या दृघटनेत गंभीर जखमी झाली आहे. दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे म्हटले जात आहे. नरेश पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे. नरेश यांच्या पत्नी राजेश्री पाटीलवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नरेश यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नरेश पाटील आणि राजेश्री पाटील हे दोघे नरेश यांच्या भावाच्या उत्तर कार्यासाठी पनवेलहून गावी दुचाकीने निघाले होते. आज सकाळी म्हसळा श्रीवर्धन मार्गावर जांभुळ गावच्या हद्दीत दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने रस्त्या शेजारी झाडीत जाऊन आदळली. या अपघातात नरेश जनार्दन पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी राजेश्री पाटील हिला गंभिर दुखापत झाली.जखमी महिलेवर म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने श्रीवर्धन पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पुण्यात १९ वर्षीय विद्यार्थ्याचा भीषण अपघात

पुण्यात हडपसरमध्ये मगरपट्टा मुंढवा रोडवर १९ वर्षीय विद्यार्थ्यांचा भीषण अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला. ही घटना काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. जिशान शेख ( वय १९ रा. उंड्री )असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. जिशान शेख हा मुंढव्याकडून मगरपट्टाच्या दिशेने इलेक्ट्रिक दुचाकी वरून जात होता.यावेळी आणखी एक दुचाकी सोबत वेगाने जात होती. दरम्यान जिशान आणि दुसऱ्या दुचाकीची स्पर्धा चालत असताना जिशानने दुचाकीचा ब्रेक लावल्याने तो उडून दुसऱ्या दिशेला जाऊन पडला. तेव्हा अचानक मुंढव्याच्या दिशेला जाणाऱ्या एका कंटेनरला त्याचे डोके जोरात आदळले. डोक्या मधून रक्ताच्या धारा निघू लागल्या होत्या,तो तडफडत होता.

मगरपट्टा मुंढवा रोडवर वाहतूक कोंडी

नागरिकांनी रुग्णवाहिका बोलवली परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस व नागरिकांनी रुग्णवाहिका बोलवून त्याला ससून रुग्णालयात पाठवले. दरम्यान त्याच्या बॅगमध्ये, त्याच्या ओळखपत्रानुसार त्याच्या नातेवाईकांना बोलावून घेतले होते. दरम्यान अपघातामुळे मगरपट्टा मुंढवा रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: "स्वतःच्या अंगाशी आलं की ते राजकारण"; मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंनी सरकारला सुनावलं

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

SCROLL FOR NEXT