Mhada Lottery  Saam Tv
मुंबई/पुणे

MHADA Lottery: मुहूर्त ठरला! तयारीला लागा; फेब्रुवारीत निघणार म्हाडाच्या घरांची लॉटरी

Mahada Lottery Date : मुंबईत घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यामुळे अनेकजण म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करतात. फेब्रुवारी महिन्यात म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.

Siddhi Hande

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या २२६४ घरांसाठीची लॉटरी फेब्रुवारी महिन्यात जाहीर होणार आहे. यापूर्वी ३१ जानेवारीला ही लॉटरी लागणार होती. मात्र, आता ही सोडत फेब्रुवारी महिन्यात जाहीर होणार आहे. (MHADA Lottery)

म्हाडाने घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. त्यानंतर आता लॉटरी कधी लागणार याबाबत माहिती समोर आली आहे.

म्हाडा कोकण मंडळानं २२६४ घरांच्या विक्रीसाठी अर्ज मागवले होते. यामध्ये ५९४ सदनिका, १५ टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेत ८२५ फ्लॅट, कोकण मंडळाच्या ७२८ फ्लॅट विक्रीसाठी आहेत. कोकण मंडळाच्या २२६४ घरांची लॉटरी ३१ जानेवारीला लागणार होती.मात्र, ही लॉटरी लांबणीवर गेली आहे. म्हाडाच्या घरांचा निकाल मोबाईलवर एसएमएस आणि ई-मेलद्वारे येईल. (MHADA Lottery Date)

म्हाडाच्या घरांसाठी अर्जप्रक्रिया ६ जानेवारीला संपली होती. त्यानंतर म्हाडाकडून अर्जदारांची यादी प्रकाशित केली होती. म्हाडाच्या घरांसाठी अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी ६ लाख रुपये उत्पन्न निश्चित केले होते. तर अल्प उत्पन्न गटासाठी ९ लाख रुपये आणि मध्यम उत्पन्न गटासाठी १२ लाखांचे उत्पन्न निश्चित केले होते.

मुंबईत स्वतः चे घर घ्यायची अनेकांची इच्छा असते. मुंबईत घर घेणे हे मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे म्हाडा परवडणाऱ्या किंमतीत घर उपलब्ध करुन देते. यासाठी लॉटरी काढली जाते. दरवर्षी म्हाडा काही घरे विक्रीसाठी उपलब्ध करत असते. यावर्षीही त्यांनी १२०० घरांसाठी सोडत काढली आहे. आता फेब्रुवारी महिन्यात ही सोडत निघणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT