Mhada Lottery  Saam Tv
मुंबई/पुणे

MHADA Lottery 2025: म्हाडाच्या २,२६४ घरांची सोडत आज, कसा आणि कुठे पाहाल रिझल्ट?

MHADA Lottery Draw For 2264 Houses: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २,२६४ घरांसाठी आज सोडत निघणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुपारी १ वाजता ही सोडत निघणार आहे. या सोडतीकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

Priya More

मुंबईमध्ये हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या तब्बल २ हजार २६४ घरांची सोडत आज निघणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या या घरांसाठी अनेकांनी अर्ज केला होता अखेर आज त्याची सोडत निघणार असून कोणाला कुठे घर लागणार हे कळणार आहे. त्यामुळे या सोडतीकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्रींच्या हस्ते निघणार सोडत -

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २,२६४ घरांसाठी आज सोडत निघणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही सोडत निघणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आज दुपारी १ वाजता सोडतीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोडतीत २४ हजार ९११ पात्र अर्जदार सहभागी होणार आहे. त्यातील ९० टक्क्यांहून अधिक अर्जदार म्हणजे २३ हजार ५७४ अर्जदार हे २० टक्के योजनेतील ५९४ घरांच्या सोडतीत सहभागी होणार आहेत.

कुठे पाहता येणार सोडत?

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घराची सोडत जाहीर झाल्यानंतर अर्जदार म्हाडाच्या वेबसाईटवर https://housing.mhada.gov.in/ जाऊन लॉटरीमध्ये आपले नाव लागले की नाही हे पाहू शकणार आहेत. त्यासाठी अर्जदाराने या वेबसाईटवर गेल्यानंतर अ‍ॅप्लीकेशन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर या अर्जदाराला त्याचे नाव लकी ड्रॉसाठी लागलं आहे की नाही हे कळणार आहे.

कुठे आहेत ही घरं?

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ घरांसाठीच्या लॉटरीमधील घरं ठाणे, कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, ओरस, वेंगुर्ला आणि मालवण याठिकाणी आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून या घरांसाठी ११ ऑक्टोबरपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आधी ही प्रक्रिया १० डिसेंबरपर्यंत होणार होती आणि सोडत २७ डिसेंबरला निघणार होती. पण घरांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती.

किती अर्ज आले?

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या या लॉटरीतील २,२६४ घरांसाठी एकूण २४ हजार ९११ पात्र अर्ज आले आहेत. १५ टक्के योजनेतील ८२५ घरांसाठी फक्त ४१७ अर्ज दाखल झाले आहेत. यामधील ४०८ घरांना प्रतिसाद मिळालेला नाही. म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ७२८ घरांसाठी फक्त ४३४ अर्ज दाखल झाले असून यामधील ३०५ घरांना प्रतिसाद मिळाला आहे. तर, २२६४ घरांच्या सोडतीतील ११७ भूखंडांसाठी १४७ अर्ज आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: गुड न्यूज! आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; १ तोळ्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?

Kalyan Police News : वाहतूक पोलिसांची मनमानी, चाहा पिण्यासाठी रस्त्यात गाडी उभी केली, ट्रॅफिक जाममुळे नागरिक संतापले

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Liver disease: एड्सपेक्षाही धोकादायक आहे 'हा'लिव्हरचा आजार; 'साइलेंट किलर' समस्येची लक्षणंही वेळीच जाणून घ्या

Fraud Case : पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत ३०० कोटींची फसवणूक; शेकडो गुंतवणूकदार अडचणीत

SCROLL FOR NEXT