MHADA  Saam TV
मुंबई/पुणे

म्हाडाचे ‘डिजी म्हाडा’ अ‍ॅप लॉन्च; सर्व सेवा आता एका क्लिकवर

Steps To File RTI Online Via DigiMHADA Mobile Application: म्हाडाने नागरिकांसाठी ‘डिजीम्हाडा’ मोबाईल अॅप लॉन्च केले असून ई-बिलिंग, तक्रार निवारण, ई-लिलाव, ऑनलाइन सोडत अर्ज आणि RTI सुविधा आता एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध होणार आहेत.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

नागरिकांना म्हाडाच्या विविध सेवा एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) ‘डिजीम्हाडा’ या मोबाईल अॅपचे लोकार्पण केले. वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते या अॅपचे उद्घाटन करण्यात आले.

या अॅपच्या माध्यमातून नागरिकांना ई-बिलिंग, तक्रार निवारण, ई-लिलाव, कंत्राटदार नोंदणी, सदनिका सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज, अर्जाची स्थिती तपासणे तसेच विविध गृहनिर्माण योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. तसेच माहितीचा अधिकार (RTI) अर्ज ऑनलाइन करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नागरिकांना अधिकृत व अचूक माहिती सहज मिळावी, कार्यालयीन भेटी आणि कागदोपत्री प्रक्रिया कमी व्हावी तसेच सेवा वितरण अधिक वेगवान आणि पारदर्शक व्हावे, या उद्देशाने ‘डिजीम्हाडा’ विकसित करण्यात आल्याचे संजीव जयस्वाल यांनी सांगितले. याशिवाय नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी म्हाडाने व्हॉट्सअॅप सेवा देखील सुरू केली असून त्यासाठी 9326258911 हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT