MHADA Lottery 2023 Saam TV
मुंबई/पुणे

MHADA Housing Lottery: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! म्हाडाच्या ५ हजार ३०९ घरांसाठी निघणार लॉटरी; अर्जविक्री कधीपासून?

MHADA Houses Lottery Application 2023: म्हाडाच्या कोकण मंडळ परिक्षेत्रातील ५ हजार ३०९ घरांच्या सोडतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.

Gangappa Pujari

MHADA Houses Lottery 2023:

मुंबईत हक्काच घर शोधणाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी. म्हाडाच्या कोकण मंडळ परिक्षेत्रातील ५ हजार ३०९ घरांच्या सोडतीसाठीची जाहिरात शुक्रवार (१५, सप्टेंबर) रोजी प्रसिद्ध होणार आहे. तसेच उद्यापासूनच ऑनलाईन अर्जविक्री आणि स्विकृतीही सुरू होणार आहे. म्हाडाकडून ही सोडत नोव्हेंबरमध्ये काढण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, म्हाडा (Mhada) कोकण मंडळाने ५ हजार ३०९ घरांच्या सोडतीची जाहिरात काढली आहे. १५ सप्टेंबरपासून यासाठी अर्ज विक्री सुरू होणार आहे. याआधी कोकण मंडळाकडून चार हजार ६५४ घरांसाठी सोडत काढण्यात आली होती.

मात्र लोकांचा याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे यामधील अनेक घरांची विक्री झाली नव्हती. त्यामुळेच या योजनेतील शिल्लक घरांसह नवीन योजनेच्या मार्फत घरांची सोडत काढण्याचा निर्णय काढण्याचा निर्णय घेतला.

एकूण ५ हजार ३०९ घरांसाठी नोव्हेंबरमध्ये सोडत काढण्यात येणार आहे, या घरांसाठी शुक्रवारी, १५ सप्टेंबरला जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. शुक्रवारपासूनच अर्जविक्री-स्वीकृती सुरू होणार आहे. या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा चारही उत्पन्न गटांतील घरांचा समावेश असेल. तसेच २० टक्के सर्वसमावेशक योजना, प्रथम प्राधान्य, म्हाडा गृहनिर्माण आणि पंतप्रधान आवास योजना अशा योजनेतील ही घरे आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पितृपक्षाच्या काळात 'हे' पदार्थ खाऊ नयेत

Pune : मावळात राजकीय भूकंप, अजित पवारांना जोरदार धक्का, बापू भेगडेंसह शेकडो कार्यकर्तांचा राष्ट्रवादीला रामराम

OMG! एक, दोन नाही...तर मातेच्या कुशीत चक्क 7 बाळं, आधी तिळे आता एकाचवेळी ४ मुलांना जन्म

Heavy Rain : हिंगोलीत मुसळधार पाऊस; वसमतमध्ये अनेक गावात शिरले पुराचे पाणी, बेरोळा गावकऱ्यांचा संपर्क तुटला

पुण्यात फक्त ₹७ लाखांत घर, म्हाडाची बंपर लॉटरी; हक्काच्या घरासाठी आजच अर्ज करा

SCROLL FOR NEXT