Mhada Lottery Saam tv
मुंबई/पुणे

Mhada 2025 : म्हाडाकडून मुंबईतील १४९ अनिवासी गाळ्यांचा ई-लिलाव; नोंदणी अन् अर्ज कुठे कराल? जाणून घ्या

Mhada news: म्हाडाकडून मुंबईतील १४९ अनिवासी गाळ्यांचा ई-लिलाव करण्यात आला आहे. ई-लिलावाविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या

Saam Tv

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबई शहरातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी ई-लिलाव आयोजित करण्यात आला. या ई-लिलावासाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला दि. १२ ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजेपासून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.

लिलावात मुंबईतील मुलुंड गव्हाणपाडा येथे ०६ अनिवासी गाळे, कुर्ला- स्वदेशी मिल येथे ०५, तुंगा पवई येथे ०२, कोपरी पवई येथे २३, चारकोप येथे २३, जुने मागाठाणे बोरीवली पूर्व येथे ०६, महावीर नगर कांदिवली पश्चिम येथे ०६ अनिवासी गाळे, प्रतीक्षा नगर सायन येथे ०९, अँटॉप हिल वडाळा येथे ०३, मालवणी मालाड येथे ४६ अनिवासी गाळे, बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व येथे १७ अनिवासी गाळे व शास्त्री नगर-गोरेगाव, सिद्धार्थ नगर, मजासवाडी जोगेश्वरी पूर्व येथे प्रत्येकी ०१ अनिवासी गाळा विक्रीसाठी उपलब्ध आहे.

म्हाडाकडून २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजेपासून सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे.

२९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई मंडळातील अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी https://eauction.mhada.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम ऑनलाईन भरणे यासाठी १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०० वाजेपासून ते २५ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय ई लिलावासाठी अर्ज करतेवेळी १८ वर्षापेक्षा जास्त असावे, अर्जदाराने महाराष्ट्र राज्यातील सन २०१८ नंतर काढलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असून ऑफसेट किंमतीनुसार विहित अनामत रक्कम भरणे गरजेचे आहे.

सदर लिलावाबाबत विस्तृत पात्रता निकष, प्रत्येक गाळ्याचे विवरण, सामाजिक आरक्षण व अर्ज करण्याची कार्यपद्धती, सविस्तर अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज सूचना,माहितीपुस्तिका याबाबतची माहिती https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या संकेतस्थळावरील Lottery>Eauction>eauction या पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्जदाराने संकेतस्थळावरील व माहिती पुस्तिकेतील सविस्तर सर्व अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करावा, असं आवाहन मंडळातर्फे करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Serial Actress: 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतील अभिनेत्रीचं सौंदर्य, फोटोवरून नजर हटणार नाही

Hruta Durgule: मराठमोळ्या हृताचं साडीत सौंदर्य बहरलं; खास लूक पाहिलात का?

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मुंबईत मराठा आंदोलनादरम्यान मराठा कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Maharashtra Live News Update: - शेतकऱ्याला भाव द्या, आरक्षणाची आम्हाला गरज राहणार नाही- बच्चू कडू

Maratha Protest: मुस्लिम महिलांचा पुढाकार! मराठा आंदोलनासाठी २,५०० भाकऱ्या बनवून दिल्या|VIDEO

SCROLL FOR NEXT