Mhada News saam tv
मुंबई/पुणे

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवली, कारण काय?

mumbai : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवली आहे

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. म्हाडा मुंबई मंडळाच्या २०२६ च्या गृहनिर्माण सोडतीत मोठा बदल करण्यात आलाय. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने सोडतीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात आहे. विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर प्रकल्पातील १२२१ सदनिकांपैकी ६१० सदनिका केवळ उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सदनिकांच्या किंमतीत यापूर्वी जाहीर केलेली ७.५ टक्के कपात कायम ठेवण्यात आलीये. प्रत्येक सदनिकेसोबत एक वाहनतळ मोफत देण्याचाही निर्णय घेण्यात आलाय.

म्हाडा मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने २६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत जाहीर करणयात आली होती. मात्र, काही प्रकल्पांना विशेषतः उच्च किमतीच्या घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर अर्ज प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आलीये. आता इच्छुक अर्जदारांना २८ मे २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी २९ मेपर्यंत अनामत रक्कम भरता येणार आहे.

विक्रोळीतील कन्नमवार नगर प्रकल्पातील संकेत क्रमांक ५३८ आणि ५३९ अंतर्गत असलेल्या १२२१ सदनिकांच्या किंमतीत ७.५ टक्के कपात करण्यात आली होती. या प्रकल्पातील ६१० सदनिका नव्या संकेत क्रमांक ५३८-अ आणि ५३९-अ अंतर्गत फक्त उच्च उत्पन्न गटासाठी राखीव करण्यात आल्यात. या बदलांची नोंद १४ मेपासून संगणकीय प्रणालीमध्ये अद्ययावत केली जाणार आहे.

म्हाडाच्या माहितीनुसार, कन्नमवार नगरमधील बिल्डिंग क्रमांक २ आणि ३ मधील सदनिकांच्या सुधारित किंमती अंदाजे १.३४ कोटी ते १.३७ कोटी रुपयांच्या दरम्यान आहेत. किंमत कपातीबरोबरच मोफत पार्किंग सुविधा देऊन अधिकाधिक अर्जदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न म्हाडाकडून करण्यात येत आहे. मुंबई मंडळाच्या या सोडतीमध्ये विक्रोळी, गोरेगाव, बोरीवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, दादर, वडाळा, पवई, माझगाव आदी भागांतील प्रकल्पांचा समावेश आहे. २६४० सदनिकांमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी १४५, अल्प उत्पन्न गटासाठी ८५८, मध्यम उत्पन्न गटासाठी ७९८ आणि उच्च उत्पन्न गटासाठी ८३९ सदनिका उपलब्ध आहेत.

सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी १० जून रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच १२ जूनपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. अंतिम यादी १६ जून रोजी जाहीर होईल. सोडतीची तारीख आणि वेळ नंतर घोषित करण्यात येणार आहे. म्हाडाने नागरिकांना दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळ आणि IHLMS 2.0 मोबाईल ॲपद्वारेच करण्यास सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! अमूल अन् मदर डेअरीचे दूध महागले, नवे दर किती?

bridge collapse : मोठा अनर्थ टळला! डंपरच्या भारानं जुना पूल कोसळला, सुधागडमधील दुर्घटना

पुण्यानंतर मुंबईत खळबळ; CSMT, BMC वर संशयास्पद ड्रोन; नागरिक भयभीत

PM मोदींच्या आवाहनाला मंत्र्यांचा ठेंगा; मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कधी कमी होणार?

हृदयद्रावक! मामाच्या गावी आलेल्या ३ शाळकरी मुलींचा धरणात बुडून मृत्यू; गावावर दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT