Metro Line 3 Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Metro: भूमिगत मेट्रो ते वाशी ब्रीज... 'या' ९ प्रकल्पामुळे मुंबईचं सौंदर्य आणखी वाढणार, वाचा सविस्तर

Rohini Gudaghe

Underground Metro to Vashi Bridge : मुंबई शहर मेट्रो ३ च्या लॉन्चसह मोठ्या पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी सज्ज झालंय. नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलचं उद्घाटन आणि मुंबई-पुणे ईवे मिसिंग लिंकचं काम देखील पूर्ण झालंय. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि शहरामधील प्रमुख भागांत कनेक्टिव्हिटी सुधारेल, अशी शक्यता आहे.

मुंबईत पुढील नऊ महिन्यांत भूमिगत मेट्रो तीनचं उद्घाटन होणार असल्याचं सांगितलं (Metro line 3) जातंय. शहरात नेहमीच वर्दळ असते, त्यामुळे हे मार्ग वापरात आल्यास वाहतूक कोंडी कमी होईल, अशी शक्यता वर्तविली जातेय. सोबतच नवी मुंबई विमानतळाचे पहिले टर्मिनल शहराच्या विमानतळावरील किरकोळ समस्यांचे निराकरण करण्यासाठी सज्ज आहे. मुंबई-पुणे मार्गावरील मिसिंग लिंकचं काम पूर्ण केल्याने दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ खूप कमी होणार आहे.

न्यु वाशी क्रिक ब्रिज

न्यु वाशी क्रिक ब्रिज सप्टेंबर महिन्यात खुला होईल, अशी शक्यता आहे. सध्याच्या पुलावर दोन्ही बाजूंना तीन लेन आहे. त्यामुळे हा सहा पदरी पूल सायन ते पनवेल महामार्गाप्रमाणे एकूण पुलाची क्षमता १२ लेनपर्यंत (Mumbai News) वाढवेल. सध्या अरुंद पुलामुळे वाहतुकीच्या अडचणी होत आहेत, त्या अडचणी दूर होण्याची अपेक्षा आहे.

समृद्धी महामार्ग

इगतपुरी ते नागपूर हा ६२४ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. मुंबई ते नागपूर द्रुतगती मार्गाचे शेवटच्या टप्प्यातील ७६ किमीचे काम पूर्णत्वास आलंय. समृद्धी महामार्गमुळे मुंबई ते नागपूर दरम्यानचा प्रवास केवळ ८ तासांत पूर्ण होणार आहे.

मेट्रो ३ चा पहिला टप्पा

आरे ते बीकेसी दरम्यान मेट्रो ३ चा पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. आरे ते बीकेसी या मार्गावर एकूण दहा स्थानके आहेत. आरे कॉलनी, सीप्झ, एमआयडीसी, (Mega Infrastructure Project) मरोळ नाका, T2 (आंतरराष्ट्रीय विमानतळ), सहार रोड, T1 (डोमेस्टिक एअरपोर्ट), सांताक्रूझ, विद्यानगर हे स्थानकं आहेत.

कोस्टल रोड

कोस्टल रोडचं संपूर्ण काम डिसेंबरमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे वांद्रे ते वरळी सी लिंकसह कोस्टल रोडच्या कनेक्टरच्या उत्तरेकडील बाजूचे बांधकाम पूर्ण होणार आहे. या मार्गाची दोन्ही बाजूंची तपासणी केली जाणार आहे. वांद्रे मार्गे मरीन ड्राइव्ह आणि आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान सिग्नलमुक्त वाहतूक होणार आहे.

SCLR विस्तार

दक्षिणेकडील पूलाचे काम फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. शिवाय नवीन टोल बूथ आणि प्रशासकीय इमारत देखील कार्यान्वित होणार आहे. मार्गाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्याचं पॅचवर्क काम (Mega Infrastructure Project In Mumbai) जवळपास पूर्ण झालंय.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम मार्च महिन्यात पूर्ण होईल, असा अंदाज आहे. सध्या ग्राउंड-आधारित नेव्हिगेशन एस उपकरणे जे विमानाला धावपट्टीच्या मध्यभागी सुरक्षित उतरण्यास मदत करतात, ते आधीच कार्यान्वित केले गेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये २ कोटी प्रवाशांना हाताळण्याची वार्षिक क्षमता असलेली एकच धावपट्टी आणि टर्मिनल यांचा समावेश आहे.

मेट्रो ३ चा दुसरा टप्पा

मेट्रो ३ चा दुसरा टप्पा मे महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. धारावी ते कफ परेड विभाग उघडल्यानंतर कॉरिडॉरचे संपूर्ण कामकाज सुरू होईल. मेट्रो ३ च्या दुसऱ्या टप्प्यात धारावी, शितलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी, आचार्य अत्रे चौक, नेहरू विज्ञान संग्रहालय, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, गिरगाव, काळबादेवी, सीएसएमटी, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड यांचा समावेश आहे.

Eway मिसिंग लिंक

Eway मिसिंग लिंकचं काम जून महिन्यात पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे दरम्यानचा सुमारे ३० मिनिटे वाहनधारकांचा वेळ वाचणार आहे. एकूण साडे सहाशे मीटरचे दोन केबल-स्टेड पूल आहेत. तसेच दोन बोगदे देखील आहेत. यातील एकाची लांबी ९ किमी आहे. जगातील सर्वात रुंद जुळे बोगदे या प्रकल्पात आहेत. या बोगद्यांची लांबी ४७ मीटर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT