Metro 3 Phase 2 Saam Tv
मुंबई/पुणे

Metro 3 Phase 2: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! आजपासून मेट्रो ३ चा दुसरा टप्पा सुरु होणार, BKC ते आचार्य अत्रे चौकापर्यंत मार्ग खुला

Metro 3 Phase 2 BKC To Acharya Atre Chowk Opening Today: आजपासून मेट्रो २चा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे.

Siddhi Hande

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आजपासून म्हणजेच ९ मे पासून मेट्रो ३चा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. आजपासून बीकेसी ते आचार्य अत्रे चौकपर्यंत मेट्रो मार्ग सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबईकर लवकरात लवकर आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचू शकणार आहेत.

आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गाचे उद्घाटन होणार आहे. यानंतर मुख्यमंत्री स्वतः बीकेसी ते सिद्धिविनायक स्टेशनपर्यंत मेट्रोने प्रवास करणार आहेत. त्यामुळे उद्यापासून प्रवासी मेट्रो ३ ने प्रवास करु शकणार आहेत.

मेट्रो ३चा दुसरा टप्पा आज सुरु (BKC Phase 3 Open today )

मेट्रो ३ चा पहिला टप्पा काही दिवसांपूर्वी सुरु झाला होता. त्यानंतर आता दुसरा टप्पा सुरु झाल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सुखकर होणार आहे. गेल्या ३-४ दिवसांपासून सीएमआरएस पथकाने या मार्गाची तपासणी केली आहे. यानंतर आयुक्तांकडून प्रमाणपत्र मिळाले. आयुक्तांकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता लगेचच मेट्रो ३ चा दुसरा टप्पा सुरु केला जाणार आहे. सध्या आरे ते बीकेसी हा मार्ग सुरु आहे. या मार्गात एकूण ११ स्थानके आहेत. यानंतर आता मेट्रो ३चा दुसरा टप्पादेखील सुरु होणार आहे.

मेट्रो ३चा दुसरा टप्प्यातील तिकीट (BKC Phase 3 Ticket Fare)

मेट्रो ३ च्या दुसऱ्या टप्प्यातील प्रवासासाठी तिकीटदेखील फार कमी आहे. तुम्हाला फक्त १० ते ५० रुपयांपर्यंत तिकीट मिळणार आहे.तुम्हाला आता आरे ते आचार्य अत्रे चौकापर्यंत फक्त ३६ मिनिटांत पोहचता येणार आहे. यासाठी तुम्हाला ६० रुपये मोजावे लागणार आहे. २२ किमी अंतर तुम्ही फक्त ३६ मिनिटांत पार करु शकणार आहात. धारावी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत ६ अंडरग्राउंड स्थानके आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT