ganesh naik saam tv
मुंबई/पुणे

फडणवीसांचा भावी मुख्यमंत्री उल्लेख करत गणेश नाईकांनी मनपा अधिकाऱ्यांना झापले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई - विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत महापालिका अधिकाऱ्यांना आमदार गणेश नाईक यांनी भर सभेत खडे बोल सुनावलेत. आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेले दिवाळे गाव हे पहिले स्मार्ट व्हिलेज होणार असून याच्या पहिल्या टप्प्यातील कामाच्या उद्घाटनासाठी विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस हे दिवाळे गावात आले होते. यावेळी भाजपा आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी केलेलं भाषण चर्चेचा विषय ठरत आहे.

हे देखील पहा -

मी सांगणार नाही की तुम्ही 2 महिन्यात मुख्यमंत्री व्हाल मात्र 2024 ला नक्कीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील ते पण स्वबळावर ही जनसामान्यांची भावना असल्याचं मत आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केलं आहे. यासोबतच आज होणारा अंधार हा कायम राहत नाही तो उजेड होऊ शकतो त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना माझा संदेश आहे. कायद्याच्या कचोटीत अयोग्य असणाऱ्या गोष्टी अयोग्य समजा परंतु कोणाच्या दबावाखाली येऊन तुम्ही त्या गोष्टी करत असाल तर दिवस बदलणार आहेत असा अप्रत्यक्ष इशाराच मनपा अधिकाऱ्यांना दिला.

आम्ही सूड घेणार या भावनेने बोलत नाही परंतु ज्या ज्या लोकांनी गोरगरिबांचा छळ केला त्या लोकांना त्याचा जाब द्यावा लागेल हा शब्द गणेश नाईक निश्चितपणे देतो अशी प्रतिक्रिया आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नवी मुंबई मनापातील अधिकाती काम करत असल्याचा आरोप भाजपा आमदार गणेश नाईक मागील अनेक महिन्यांपासून करत असून अखेर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच आमदार गणेश नाईक यांनी मनपा अधिकाऱ्यांवरील आपला रोष व्यक्त केला.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT