Mega Block Saam Digital
मुंबई/पुणे

Mega Block : पुणे रेल्वेकडून ४ दिवस मेगाब्लॉक; 20 ट्रेनचे मार्ग बदलले, अनेक ट्रेन रद्द

Pune Railway Mega Block : पुणे रेल्वे विभागातील दौंड गुडस यार्ड आणि दौंड कार्ड लाईन येथील इंटरलॉकिंगचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे 29 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Sandeep Gawade

पुणे रेल्वे विभागातील दौंड गुडस यार्ड आणि दौंड कार्ड लाईन येथील इंटरलॉकिंगचं काम करण्यात येणार आहे. या कामासाठी 29 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दिवसाला 20 पेक्षा जास्त रेल्वे गाड्या रद्द होणार आहेत. तर 15 ते 20 गाड्यांचे मार्ग वळवण्यात येणार आहेत. काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करताना काळजी घ्यावी, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

मुंबईत रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

२८ जुलै २०२४ रोजी म्हणजेच रविवारी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील काही तांत्रिक कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे.

रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा -ठाणे अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल - वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर रविवारी सकाळी मेगाब्लाक घेण्यात आलेला नाही. पण पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन मेगाब्लॉक असेल. बोरिवली ते भाईंदर अप- डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT