Pune–Mumbai Express & Local Trains Cancelled on December 7 Saam
मुंबई/पुणे

पुणे - मुंबईदरम्यान धावणाऱ्या १७ ट्रेन्स रद्द, लोकलवरही होणार परिणाम, वाचा संपूर्ण लिस्ट

Pune–Mumbai Express & Local Trains Cancelled on December 7: पुणे - मुंबई मार्गावर ७ डिसेंबर रोजी मोठा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे एकूण १७ एक्स्प्रेस रद्द.

Bhagyashree Kamble

मुंबई- पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी. पुणे - मुंबई रेल्वे मार्गावर उद्या म्हणजेच ७ डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याचा थेट फटका काही एक्स्प्रेस गाड्या आणि पुणे - लोणावळा येथील लोकलला बसणार आहे. या मेगाब्लॉकमुळे अनेक एक्स्प्रेस गाड्या आणि लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

पुणे - मुंबई रेल्वे मार्गावर उद्या (७ डिसेंबर २०२५) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या पुणे विभागाने लोणावळा - कल्याण विभागात आर अँड डी अप आणि डाउन लाईन्स विस्तारण्यासाठी तसेच अप यार्डमध्ये एक अतिरिक्त लाईन टाकण्याच्या कामांसाठी ६ते ७ डिसेंबर रोजी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जारी केला आहे.

या मेगाब्लॉकचा थेट परिणाम विविध गाड्यांच्या मार्गक्रमणावर होणार असून, काही गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. हा मेगाब्लॉक दुपारी २:१५ ते सायंकाळी ६:१५ या वेळेत राहणार आहे. याचा परिणाम पुणे- मुंबई मार्गावरील अनेक एक्स्प्रेस गाड्या, यासह पुणे लोणावळ उपनगरिय लोकल सेवेवर होणार आहे.

सिंहगड एक्सप्रेस ,डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस यांसह पुणे- मुंबई दरम्यान धावणाऱ्या एकूण १७ गाड्या उद्या रद्द राहणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली. या मेगाब्लॉकचा परिणाम हजारो प्रवाशांवर होणार असून, प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, महापरिनिर्वाण दिन लक्षात घेता मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करणार असल्यानं, अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आवश्यक असल्यास प्रवाशांनी IRCTC पोर्टल किंवा रेल्वे स्थानक काउंटरवर तिकिट रद्द/बदल करून घ्यावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hotel Fire : झोपेतच काळाचा घाला! श्रावण सोमवारी मंदिराबाहेरील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आग, ६ जण जिवंत जळाले अन्

High cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल 30 दिवसांत कमी कराचंय? आजच हे 3 बदल करा, लगेच दिसेल परिणाम

Nagpanchami Special : तुळजाभवानी मंदिरात पुरुष भाविकांना प्रवेश बंद, नेमकं काय कारण?

Maharashtra News Live Update: नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी

BJP New Team: भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा आज, कुणाला कोणती जबाबदारी मिळणार? संभाव्य यादी समोर

SCROLL FOR NEXT