Mumbai central line local  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local : रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक; लोकल उशीराने धावणार, जाणून घ्या सविस्तर

Mega Block On Mumbai Local : कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या वेळापत्रकानुसार थांबवल्या जातील.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक (Mega Block) घोषित केला आहे. मेगाब्लॉकमुळे काही एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे, यामुळे लोकल (Local) १० मिनिटे उशिराने धावतील. (Mumbai Local Mega Block News In Marathi )

हे देखील पाहा -

कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या वेळापत्रकानुसार थांबवल्या जातील, पुढे मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ पर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भाजप प्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यात पहिल्यांदाच आगमन; कार्यकर्त्यांकडून स्वागत

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Beed News: शाळा बनली कुस्तीचा आखाडा; शिक्षक आणि क्लर्कमध्ये हाणामारी पाहा,VIDEO

SCROLL FOR NEXT