Video : ...म्हणून मी CM शिंदेंसमोरील माईक घेतला; 'त्या' आरोपांवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरील माइक खेचून घेतल्याच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं.
Devendra Fadnavis And Eknath Shinde Maharashtra Politics Update
Devendra Fadnavis And Eknath Shinde Maharashtra Politics UpdateSAAM TV

रश्मी पुराणिक

मुंबई: राज्यात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर विरोधकांकडून रोज टीका-टिप्पणी केली जाते. एका पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंच्या समोरील माईक ओढला, तसेच दुसऱ्या पत्रकार परिषदेत शिंदेंना चिठ्ठी लिहून दिली आणि शिंदे त्यावर बोलले, असा आरोप विरोधकांकडून होत आहे.

काँग्रेसने तर, त्यांच्या ट्विटर हँडलवरून त्याचा व्हिडिओही शेअर केला आहे. देवेंद्र फडणवीस सांगतात आणि शिंदे बोलतात, असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. तसेच विरोधकांना प्रत्युत्तरही दिले आहे. (Eknath Shinde-Devendra Fadnavis Latest Update)

Devendra Fadnavis And Eknath Shinde Maharashtra Politics Update
संभाजीनगरच्या नावाला स्थगिती नाही, उद्या कॅबिनेटमध्ये अधिकृत निर्णय घेऊ; एकनाथ शिंदेंची घोषणा

राज्यात शिंदे गट आणि भाजपचं सरकार सत्तेत आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दोन्ही नेत्यांचा शपथविधी झाल्यानंतर कॅबिनेट बैठका घेऊन अनेक निर्णय घेतले आहेत. काही निर्णयांना तर विरोधकांनी विरोध केला आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर, एकनाथ शिंदे बोलताना मध्येच फडणवीस यांनी शिंदेंसमोरील माइक घेतला होता. यावरून विरोधकांनी फडणवीस आणि शिंदे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला फडणवीस यांनी पहिल्यांदाच उत्तर दिले आहे.

Devendra Fadnavis And Eknath Shinde Maharashtra Politics Update
Eknath Shinde: ५० जणांपैकी एकही आमदार पराभूत झाला तर मी राजकारण सोडेन: एकनाथ शिंदे

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज, शुक्रवारी या आरोपांना उत्तर दिलं आहे. शिंदे यांच्यासमोरील माइक का घेतला यामागचं कारण त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे एका प्रश्नावर उत्तर देत होते. ते बोलत असतानाच, संबंधित प्रतिनिधीने हा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना आहे, त्यांनी उत्तर द्यावे असे सांगितले. त्यामुळे मी तो माइक घेतला. पण काहींनी ते म्युट करून दाखवले. मी एखादी चिठ्ठी लिहून दिली तर, त्यात गैर काय आहे, असेही फडणवीस म्हणाले.

कुठल्याही सरकारमध्ये सुपर सीएम नसतो. तोच नेता आणि प्रमुख असतो. आमचा एकच सीएम आहे, ते म्हणजे एकनाथ शिंदे. त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत. प्रश्न हा आहे की काहींना ते बघवत नाही. तुम्हाला आता विरोधात बसण्याची सवय करायला हवी, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com