Mahavikas Aghadi Saam Tv
मुंबई/पुणे

केंद्राविरोधात महाविकास आघाडीसह डाव्या संघटनांचा एल्गार, पुण्यात जंगी सभा

ही सभा इंधन दरवाढ, महागाई, राज्यात वाढणाऱ्या धर्मांध गोष्टींविरोधात होणार आहे.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ३० एप्रिल रोजी महविकासआघाडीतर्फे (Mahavikas Aghadi) केंद्र सरकारच्या विरोधात सद्भावना निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात सायंकाळी ५ वाजता ही सभा होणार असून, या सभेत केंद्र सरकारच्या विरोधात काही ठराव मांडण्यात येणार असल्याचे महविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेत जाहीर केलं आहे, या सभेला महाविकासआघाडीच्या तिन्ही पक्षासह डाव्या आणि पुरोगामी पक्ष संघटना देखील उपस्थित राहणार आहेत.

देशांमध्ये राज्यांची आर्थिक आणि राजकीय कोंडी करणारे निर्णय केंद्रामधील मोदी (Modi Government) सरकार घेत आहे. त्यामुळे आपल्या राज्यघटनेलाच सुरुंग लागत असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

हे देखील पाहा

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या महगाई विरोधात काम करण्याचं सोडून यावरून जनतेच लक्ष वळवण्यासाठी धर्मांचा वापर करत लोकांचं लक्ष वळवल जात आहे,असा आरोप करत केंद्र सरकारच्या याच धोरणांच्या विरोधात महाविकास आघाडीने या सभेचं आयोजन केलं आहे.

इंधन दर (Petrol), महागाई, राज्यात वाढणाऱ्या धर्मांध सत्तेच्या विरोधात ही सभा होणार असल्याची माहिती देखील नेत्यांकडून देण्यात आली आहे. राज्यातले आणि देशातले अनेक पक्षाचे नेते या सभेला उपस्थित राहणार असून मात्र अद्यापही या नेत्यांची नावे गुलदस्त्यात आहेत.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET पेपर फोडणारा मुख्य सूत्रधार मोकाटच, NEET पेपरफुटीचे 9 आरोपी राज्यात

आयोध्येनंतर बाळूमामा देवस्थानातही घोटाळा, देवस्थानात कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार?

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट; कर्जमुक्ती योजनेतील पहिली मोठी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

Maharashtra News Live Update: आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर नगरी सजली

मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रपतींकडून मंजुरी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT