शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत राष्ट्रवादीची बैठक; काय होणार चर्चा? Saam TV
मुंबई/पुणे

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत राष्ट्रवादीची बैठक; काय होणार चर्चा?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राजधानी दिल्लीमध्ये आजचा दिवस राजकीय घडामोडींचा असणार आहे. केंद्रीय पातळीवर विरोधकांची मोट बांधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पर्याय उभा करण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत. या मोहिमेचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) करत आहेत. शरद पवार यांच्या पक्षाची म्हणजेच राष्ट्रवादीची आज (NCP) दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

हे देखील पहा-

दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत काँग्रेस नेते संजय राऊत ‌यांना भेटणार आहेत. सेना यूपीएमध्ये सहभागी होत असल्याची चर्चा आता सध्या सुरू झाली आहे. राज्यात आगामी काळात विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची असणार आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षात संघटानत्मक बदलांबद्दल देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

मागच्या काळात शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांची भेट झाली होती. त्या भेटीच्या पार्श्वभूमीवर देखील ते पक्षाला मार्गदर्शन करणार आहेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींचे २७ टक्के आरक्षण रद्दबातल ठरवले आहे. या निवडणुका आता पुढे ढकले जावे, अशी मागणीही होऊ लागली आहे. त्याविषयी आज दिल्लीत चर्चा होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

SCROLL FOR NEXT