Former Thane Mayor Meenakshi Shinde’s resignation has triggered unrest within the Shinde Sena camp ahead of civic elections. Saam Tv
मुंबई/पुणे

ठाण्यात शिंदेसेनेत नाराजीनाट्य, मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, शिंदेसेनेत अस्वस्थता

Meenakshi Shinde Resignation Reason In Thane: एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नाराजीनाट्य रंगलयं...माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिलाय... मात्र शिंदेसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्य़ावर का आला?

Suprim Maskar

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात महापालिका निवडणुकीआधीच नाराजीनाट्य रंगलयं...ठाण्यात शिंदेसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी आपल्य़ा पदाचा राजीनामा दिल्यानं एकच खळबळ उडाली...एवढंच नाही तर शिंदेसेनेच्या शाखेत मीनाक्षी शिंदेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली.

ठाण्यात भूषण भोईर या माजी नगरसेवकाला पुन्हा तिकीट मिळू नये. यासाठी काही शाखाप्रमुखांनी आंदोलन केलं . यात प्रभाग क्रमांक 3 मनोरमा नगरचे शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांचाही समावेश होता. विक्रांत वायचळ हे मिनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यात शाखाप्रमुखांच्या आंदोलनानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत यांची शिंदेसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. मुळात भोईर कुटुंबियांच्या घराणेशाहीला मीनाक्षी शिंदेंचाही विरोध होता..त्यामुळे वायचळ यांची हकालपट्टी झाल्याने मीनाक्षी शिंदेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा आहे

आतापर्यंत ठाकरेसेनेला धक्का देत एकनाथ शिंदेंनी ठाकरेसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत पक्षप्रवेश करून घेतला... मात्र आता एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्यानं ही पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करणं शिंदेसेने पुढचं मोठं आव्हान असणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसची 'वंचित'ला निवडणुकीसाठी साद; प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार? VIDEO

भारतातही 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी? कारण काय? VIDEO

Saturday Horoscope : येत्या काही दिवसांत मोठं काही तरी घडणार; 5 राशींच्या लोकांचे आयुष्य आनंदाने फुलून जाणार

Pune Politics : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटली? पुण्यात नेमकं काय घडलं?

Syria Masjid Blast : मशिदीत नमाजावेळी बॉम्बस्फोट; 12 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT