Measles Disease Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईकरांच्या चिंतेत भर! आणखी एका बालकाचा गोवरने मृत्यू, मृतांचा आकडा ११ वर

मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून गोवरमुळे मृत्यू होण्याच्या संख्येने चिंता वाढवली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात गोवर रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दिवसेंदिवस गोवरचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य प्रशासनाचं टेन्शन वाढलं आहे. मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून गोवरमुळे मृत्यू होण्याच्या संख्येने चिंता वाढवली आहे. मंगळवारी गोवरने आणखी एका चिमुकल्याचा बळी घेतला. (Latest Marathi News)

नालासोपारा येथे राहणाऱ्या एक वर्षाच्या बालकाचा गोवरमुळे मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईत गोवरने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आता ११ इतकी झाली आहे. मृतांपैकी ८ मुंबईतील तर तीन मुंबई बाहेरील रुग्ण आहेत. सद्यस्थितीला मुंबईत गोवरचे २२० रुग्ण उपचार घेत आहेत.

मुंबईत (Mumbai) गोवरचा विळखा बसला असून मुंबईतील झोपडपट्टी भागात गोवरचा उद्रेक झाला आहे. भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, अंधेरी पूर्व, कुर्ला , भांडुप, मालाड, चेंबूर, गोवंडी, दहिसर या भागात गोवरचे अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या भागात सर्वेक्षण करण्यात येत असून संशयित रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे.

मुंबईत गोवरचे रुग्ण आढळल्यानंतर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी दिवसभरात मुंबईत गोवरच्या १७० संशयित रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. विशेष बाब म्हणजे, गेल्या दोन महिन्यांत १९ मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १७ मुलांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shopping For Ladies: प्रत्येक महिलेने स्वतःसाठी खरेदी करायला हव्या 'या' महत्वाची गोष्ट

Maharashtra Politics: अजित पवारांनी बैठक रद्द का केली? कोणता दलाल आडवा आला? – नाना पटोलेंचा विधानसभेत घणाघात| VIDEO

Pimpri Chinchwad : महापारेषणचा बिघाड; महावितरणच्या ५२ हजार वीजग्राहकांना फटका, पिंपरी परिसरात रात्रीपासून अंधार

Maharashtra Live News Update : चार्जरच्या वायरनं नवऱ्याने केला बायकोचा खून, नवऱ्याने स्वत:लाही संपवलं

Political News : 'शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं, आधी...'; वसंत मोरे यांचं खासदार दुबे यांना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT