मावळ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना धनंजय मुंडे सामाजिक न्यायमंत्री असल्याचा विसर!
मावळ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना धनंजय मुंडे सामाजिक न्यायमंत्री असल्याचा विसर! दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

मावळ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना धनंजय मुंडे सामाजिक न्यायमंत्री असल्याचा विसर!

दिलीप कांबळे

मावळ : विविध विकास कामांच्या भूमीपूजनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे आज मावळ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तब्बल तीस वर्षांनंतर येत आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी मावळ मध्ये करण्यात आली आहे.

हे देखील पहा :

सायंकाळी पाच वाजता अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची सभा होणार आहे. मात्र, सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या स्टेजवरील स्क्रिनवर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा उल्लेख उपमुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांचा उल्लेख उपमुख्यमंत्री असा असल्यामुळे सर्वच जण चकित झाले आहेत.

तर, कार्यक्रम स्थळी धनंजय मुंडे यांचा उपमुख्यमंत्री उल्लेख असल्यामुळे राज्याला दोन उपमुख्यमंत्री केंव्हा मिळाले याची चर्चा रंगू लागली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री असल्याचा विसर पडल्याचे यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मंदा म्हात्रे यांनी थेट राजीनामा नाट्यावर केला मोठा खुलासा

Maharashtra Election: नाशिक लोकसभा मतदारसंघात अवघ्या २४ तासात नवा ट्वीस्ट; समता परिषदेने घेतली नवी भूमिका

Benifits of Guar: अनेकांना नापसंत असणारी गवार आरोग्यासाठी आहे फायदेशीर

Ratnagiri Sindhudurg : विनायक राऊतांनी नारायण राणेंचा भूतकाळ काढला; अनेक गोष्टी सांगून टाकल्या!

Pimpri Chinchwad News Today: पिंपरी-चिंचवडमध्ये मर्सिडीजमध्ये चक्क 29 लाखांची रोकड आढळून आल्यानं आश्चर्य!

SCROLL FOR NEXT