Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Maval Crime News: धक्कादायक! कामशेत रेल्वे स्टेशनवर तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात खळबळ

Kamshet Crime News: कामशेत पोलीस पथकाने काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दिलीप कांबळे

Maval Crime News: मावळामधील (Maval) कामशेत रेल्वेस्थानकावर तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या करुन आरोपी फरार झाले होते मात्र कामशेत पोलीस पथकाने काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, मावळातील कामशेत रेल्वे स्टेशनवर एका तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. ही हत्या करून आरोपी फरार झाले होते, मात्र कामशेत पोलीस पथकाने काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत तर आणखी दोन संशयित साथीदारांचा शोध कामशेत पोलीस घेत आहे. विजय सतू भोंडवे असे खून झालेल्या इसमाचे नाव असून तो कार्ला येथील रहिवासी आहे.

तर संतोष महादेव घाटे असे ताब्यात घेतलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. या तरुणाने भीषण हत्या का केली याचा तपास पोलीस करत आहे. दरम्यान, खून रेल्वे स्थानकाच्या हद्दीत झाल्याने कामशेत पोलीसांनी आरोपीला चिंचवड सीआरपीएफ पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. त्यामुळे या घटनेचा पुढील तपास रेल्वे पोलिस करणार आहेत. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

SCROLL FOR NEXT