Kishor Aware Case pune Saamtv
मुंबई/पुणे

Kishor Aware News: किशोर आवारे हत्या प्रकरण! बापाला मारल्याच्या रागातून केली निर्घृण हत्या; नगरसेवकाच्या मुलास अटक

Kishor Aware Death Update: अटकेतील आरोपींनीच हत्येमागचं कारण सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.

दिलीप कांबळे

Pune Maval Kishor Aware Case Update: पुण्यातील मावळमध्ये भर दिवसा मुळशी पॅटर्नचा थरारक घटना पाहण्यास मिळाली. दोन दिवसांपूर्वी मावळमधील तळेगावमध्ये (Talegaon) जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण मावळ तालुका हादरुन गेला आहे.

या हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून पाच आरोपींना काल अटक करण्यात आली होती. यामध्ये आता नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे ने ही हत्या घडवून आणल्याचे तपासात समोर आलेलं आहे. (Maval Crime News)

कानाखाली मारल्याचा राग....

याबाबत अधिक माहिती अशी की, तळेगावमधील (Maval) किशोर आवारे (Kishor Aware) हत्या प्रकरणाने आणखी नवं वळण घेतलेलं आहे. नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे ने ही हत्या घडवून आणल्याचे तपासात समोर आलेलं आहे. अटकेतील आरोपींनीच हत्येमागचं कारण सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. त्यानंतर गौरव खळदेला तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Marathi News)

काही महिन्यांपूर्वी जुन्या नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात खडाजंगी झाली होती. तेंव्हा आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. याचाच राग मनात धरून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचे ठरवले. त्यानुसार नगरपरिषद कार्यालयातच किशोर आवारे यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली.

या प्रकरणातील पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली. तेंव्हा त्यांनी गौरव खळदेच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबुली दिली, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली. या भयंकर हत्या प्रकरणाने संपूर्ण मावळ तालुका हादरुन गेला असून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT