Mauris Noronha Saam Tv
मुंबई/पुणे

Mauris Noronha: घोसळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला तिसऱ्या व्यक्तीने संपवलं?, ठाकरे गटाच्या आमदाराचा खळबळजनक दावा

साम टिव्ही ब्युरो

>> अक्षय गवळी

Abhishek Ghosalkar News Update :

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर मॉरिस भाईला कोणत्या तरी तिसऱ्याच व्यक्तीने संपवलं, अशी शंका ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी व्यक्त केली आहे.

'आपला गेम करण्याचं षडयंत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रचलं'

यासोबतच आमदार देशमुख यांनी एक मोठा आरोप केलाय आहे. आपण जेव्हा एकनाथ शिंदे सोबत सुरतला गेलो तेव्हा आपला 'गेम' करण्याचं षडयंत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रचलं होतं, असा गंभीर आरोप अकोला जिल्ह्यातील ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.

ही माहिती शिंदे गटाच्या एका आमदारानेच आपल्याला दिल्याचा दावा नितीन देशमुख यांनी केला आहे. सत्ता स्थापनेत आपला अडथळा होणार असल्याने आपला 'गेम' करण्याचा प्लॅन रचला गेल्याचा आमदार नितीन देशमुखांचा आरोप आहे. यातूनच आपल्याला हृदयविकाराचा झटका आल्याच्या खोट्या बातम्या पेरल्या गेल्याचा आमदार देशमुख यांचा दावा आहे.  (Latest Marathi News)

दरम्यान, अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळीबार करून हत्या करण्यात आली. मॉरीस नोरोन्हो या व्यक्तीने त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या आणि नंतर त्याने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली, असं सांगितलं जात आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, मॉरिसने गुरुवारी रात्री त्याच्या बोरिवलीच्या आय सी कॉलनीतील कार्यालयामध्ये हळदी-कुंकू आणि साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्याने अभिषेक घोसाळकरांना देखील आपल्या कार्यालयात बोलावलं. घुसाळकरांबरोबर त्याने कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर सुरुवातीला फेसबुक लाईव्ह केले आणि त्यादरम्यानच त्याने घोसाळकरांवर पाच गोळ्या झाडल्या. ज्यात घोसाळकर यांचा मृत्यू झाला. नंतर त्यानेही आपलं जीवन संपवलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT