Neral-Matheran Mini Train Service Restarts : पर्यटकांचे लाडके आणि हक्काचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. नेरळ-माथेरान 'मिनी ट्रेन' सेवा शुक्रवारपासून पुन्हा एकदा पूर्ववत सुरू होत आहे. रेल्वेकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
पावसाळा संपल्यामुळे आता पर्यटकांना पुन्हा एकदा निसर्गरम्य घाटातून मिनी ट्रेनने प्रवास करता येणार असून, मध्य रेल्वेने या सेवांचे सुधारित वेळापत्रक आणि डब्यांची रचना जाहीर केली आहे. यामध्ये विस्टाडोम डब्यांचाही समावेश असून अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा आधीप्रमाणेच सुरू राहणार आहे.
नेरळ - माथेरान रेल्वे सेवा दिनांक ३०.१०.२०२६ पासून पुन्हा सुरू होणार असल्याचे रेल्वेने जाहीर केले. संरक्षेच्या कारणास्तव, पावसाळ्याच्या काळात (जून ते ऑक्टोबर) नेरळ आणि माथेरान दरम्यानची रेल्वे सेवा बंद ठेवली जाते; मात्र, माथेरान आणि अमन लॉज दरम्यानची शटल सेवा वेळापत्रकानुसार सुरू राहते.
नेरळ - माथेरान आणि अमन लॉज - माथेरान दरम्यानच्या रेल्वे सेवांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:-
(अ) नेरळ – माथेरान – नेरळ मिनी ट्रेन सेवा:–
नेरळ - माथेरान डाउन गाड्या
१. गाडी क्रमांक 52103: नेरळ येथून (दररोज) ०८.५० वाजता सुटेल आणि माथेरान येथे ११.३० वाजता पोहोचेल.
२. गाडी क्रमांक 52105: नेरळ येथून (दररोज) १०.२५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे १३.०५ वाजता पोहोचेल.
माथेरान – नेरळ अप गाड्या
१. गाडी क्रमांक 52104: माथेरान येथून (दररोज) १४.४५ वाजता सुटेल आणि नेरळ येथे १७.३० वाजता पोहोचेल.
२. गाडी क्रमांक 52106: माथेरान येथून (दररोज) १६.०० वाजता सुटेल आणि नेरळ येथे १८.४० वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 52103/52104 मध्ये एकूण ६ डबे असतील, ज्यामध्ये ३ द्वितीय श्रेणी, १ विस्टाडोम डबा आणि २ द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅन यांचा समावेश असेल.
गाडी क्रमांक 52105/52106 मध्ये एकूण ६ डबे असतील, ज्यामध्ये ३ द्वितीय श्रेणी, १ प्रथम श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅन यांचा समावेश असेल.
(ब ) अमन लॉज – माथेरान – अमन लॉज शटल सेवा
अमन लॉज – माथेरान शटल सेवा (दररोज)
१. गाडी क्रमांक 52153: अमन लॉज येथून ०८.४५ वाजता सुटेल, माथेरान येथे ०९.०३ वाजता पोहोचेल.
२. गाडी क्रमांक 52155: अमन लॉज येथून ०९.३५ वाजता सुटेल, माथेरान येथे ०९.५३ वाजता पोहोचेल.
३. गाडी क्रमांक 52157: अमन लॉज येथून १२.०० वाजता सुटेल, माथेरान येथे १२.१८ वाजता पोहोचेल.
४. गाडी क्रमांक 52159: अमन लॉज येथून १४.२५ वाजता सुटेल, माथेरान येथे १४.४३ वाजता पोहोचेल.
५. गाडी क्रमांक 52161: अमन लॉज येथून १५.४० वाजता सुटेल, माथेरान येथे १५.५८ वाजता पोहोचेल.
६. गाडी क्रमांक 52163: अमन लॉज येथून १७.४५ वाजता सुटेल, माथेरान येथे १८.०३ वाजता पोहोचेल.
शनिवार/रविवार रोजी खालीलप्रमाणे अतिरिक्त विशेष सेवा उपलब्ध असतील:
७. विशेष-१: अमन लॉज येथून १०.३० वाजता सुटेल, माथेरान येथे १०.४८ वाजता पोहोचेल.
८. विशेष-३: अमन लॉज येथून १३.३५ वाजता सुटेल, माथेरान येथे १३.५३ वाजता पोहोचेल.
माथेरान – अमन लॉज शटल सेवा (दररोज)
१. गाडी क्रमांक 52154: माथेरान येथून ०८.२० वाजता सुटेल, अमन लॉज येथे ०८.३८ वाजता पोहोचेल.
२. गाडी क्रमांक 52156: माथेरान येथून ०९.१० वाजता सुटेल, अमन लॉज येथे ०९.२८ वाजता पोहचेल.
३. गाडी क्रमांक 52158: माथेरान येथून ११.३५ वाजता सुटेल, अमन लॉज येथे ११.५३ वाजता पोहोचेल.
४. गाडी क्रमांक 52160: माथेरान येथून १४.०० वाजता सुटेल, अमन लॉज येथे १४.१८ वाजता पोहोचेल.
५. गाडी क्रमांक 52162: माथेरान येथून १५.१५ वाजता सुटेल, अमन लॉज येथे १५.३३ वाजता पोहोचेल.
६. गाडी क्रमांक 52164 माथेरान येथून १७.२० वाजता सुटेल, अमन लॉज येथे १७.३८ वाजता पोहोचेल.
शनिवार/रविवार रोजी खालीलप्रमाणे अतिरिक्त विशेष सेवा उपलब्ध असतील:
७. विशेष-२: माथेरान येथून १०.०५ वाजता सुटेल, अमन लॉज येथे १०.२३ वाजता पोहोचेल.
८. विशेष-४: माथेरान येथून १३.१० वाजता सुटेल, अमन लॉज येथे १३.२८ वाजता पोहोचेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.