Bhayandar East Fire Saam TV
मुंबई/पुणे

Breaking News: भाईंदरमधील आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग; अनेक झोपड्या जळून खाक, थरकाप उडवणारा VIDEO

Bhayandar East Fire: भाईंदर पूर्वेच्या आझादनगर परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामाला बुधवारी (ता.२८) पहाटे ६ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.

Satish Daud

महेंद्र वानखेडे, साम टीव्ही मीरा भाईंदर

Meera Bhayander Fire News

भाईंदर पूर्वेच्या आझादनगर परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामाला बुधवारी (ता.२८) पहाटे ६ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण करत परिसरातील काही झोपड्यांना विळखा घातला. आग लागल्याचं कळताच सर्वत्र आरडाओरड सुरू झाली. परिसरातील नागरिकांनी जीव मुठीत घेऊन बाहेर धाव घेतली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही झोपड्या जळून खाक झाल्या असून काहीजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ४ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या आग विझवण्याचे काम सुरू आहे. भाईंदर पूर्वेकडील आझादनगर परिसर हा वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणी भंगाराची दुकाने तसेच झोपडपट्टी आहे.

बुधवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास एका भंगाराच्या दुकानाला अचानक आग लागली. या आगीने काही झोपड्यांना विळखा घातला. आग लागल्याचे कळताच येथील अनेक नागरिकांनी हाताला मिळेल ते सामान घेऊन परिसर सोडला. आगीचे मोठमोठे लोळ परिसरात पसरल्याने एकच भीतीचे वातावरण पसरलं आहे.

आगीत अनेकांचे घर जळून खाक झाले असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच मीरा भाईंदर पालिकेच्या अग्निशमन दलाचे ४ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya gochar: दिवाळीपूर्वी सूर्य-मंगळाने बनवला खास राजयोग; 'या' राशींच्या घरी येईल लक्ष्मी, घराची भरभराटही होईल

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT