Mumbai Timber Market Fire Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Fire News: मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाचे १८ बंब घटनास्थळी

Satish Daud

Mumbai Grant Road Area Timber Market Fire

मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. ग्रँट रोड परिसरातील टिंबर मार्केटमध्ये गुरुवारी (२५ जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. स्थानिकांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १८ फायर इंजिन आणि २२ टँकर घटनास्थळी दाखल झाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. आग लागताच स्थानिकांनी बाहेर धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, आगीच्या ठिकाणी एकाचा मृतदेह आढळला असून पुढील प्रक्रियेसाठी तो जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

आगीमुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. बुधवारी (२४ जानेवारी) गोरेगाव पश्चिमेकडील इमारत आणि राम मंदिर परिसरातील एकमेव इंडस्ट्रियल आग लागल्याची घटना घडली.

त्यानंतर गुरुवारी (२५ जानेवारी) सांताक्रुझ पश्चिमेकडील एका इमारतीच्या तळघराला आग लागल्याची घटना घडली. या दोन्ही घटना ताज्या असतानाच, गुरुवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ग्रँट रोड परिसरातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. (Latest Marathi News)

आग इतकी भीषण होती, की एका इमारत आणि जवळ असलेला मॉलपर्यंत ज्वाला पोहचत होत्या. सुदैवाने इमारतीतील रहिवासी वेळेवर बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला. आगीच्या ठिकाणी एकाचा मृतदेह आढळला असून पुढील प्रक्रियेसाठी तो जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मध्यरात्रीपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. या भीषण आगीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT