Churchgate Railway Station Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकावर अग्नितांडव, अचानक आग लागल्यामुळे सर्वच घाबरले, प्रवाशांची पळापळ अन्...|VIDEO

Churchgate Railway Station Fire: मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकावर भीषण आग लागली. या स्थानकावरील दुकानाला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Priya More

मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकावर भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे स्थानकावरील एका दुकानाला भीषण आग लागली. या आगीमुळे प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग वाढत असल्यामुळे चर्चगेट रेल्वे स्थानकावर सगळीकडे धूर पसरला आहे त्यामुळे प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. सर्वांची पळापळ झाली. या आगीचा व्हिडिओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चर्चगेट रेल्वे स्थानकावरील केकच्या दुकानाला आग लागली. सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या दुकानच्या आसपासच्या दुकानांमध्ये काम करणाऱ्यांनी तात्काळ बाहेर धाव घेतली. चर्चगेट रेल्वे स्टेशनवर प्रवाशंची जास्त वर्दळ असते. ऐन गर्दीच्या वेळी ही आगीची घटना घडल्यामुळे एकच गोंधळ उडाला. प्रवाशांची पळापळ झाली.

चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या गेटजवळ ही घटना घडली. या रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये सगळीकडे धूर पसरला. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागल्यामुळे चर्चगेट स्टेशनवरील सब वे बंद करण्यात आला आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीत 5 दिवस खाता येतील अश्या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाचे काम आद्यपही अपूर्णच

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT