Mumbai Fire  Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईत अग्नितांडव! जोगेश्वरीमध्ये इमारतीला भीषण आग, काही जण अडकले; परिसरात पसरले धुराचे लोट| VIDEO

Mumbai Fire : मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये उंच इमारतीला भीषण आग लागली. जेएनएस बिझनेस सेंटर या इमारतीला आग लागली असून यामध्ये अनेक जण अडकल्याची शक्यता आहे. परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

Priya More

Summary -

  • जोगेश्वरी पश्चिमेतील जेएनएस बिझनेस सेंटरला भीषण आग

  • आग इमारतीच्या दोन ते तीन मजल्यांपर्यंत पसरली

  • परिसरात धुराचे लोट आणि वाहतूक कोंडी झाली

  • काही लोक इमारतीत अडकल्याची भीती

  • अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

संजय गडदे, मुंबई

मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. जोगेश्वरीतील जेएनएस बिझनेस सेंटर या उंच इमारतीला आज सकाळच्या सुमारास आग लागली. या इमारतीमध्ये काही जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सगळीकडे धुराचे लोट पसरे असून आग वाढतच चालली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील बेह्रमपाडा परिसरातील जे.एन.एस. बिझनेस सेंटर या उंच इमारतीला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना सकाळी १०:५१ वाजता घडली आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आग इतकी भीषण आहे की ती वाढतच चालली आहे. दोन ते ३ मजल्यापर्यंत आग पसरली आहे.

आग लागल्यामुळे आसपासच्या परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. या आगीचे अनेक व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. जे सध्या वाढत चालले आहे. या इमारतीमध्ये काही जण अडकल्याचे सांगितले जात आहे. या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचावकार्य केले जात आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलासोबत पोलिस, १०८ अॅम्ब्युलन्स सेवा, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), बीएमसीच्या वॉर्ड कर्मचाऱ्यांसह वीज वितरण कंपनीचे कर्मचारी कार्यरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बारामतीत अवकाळी पावसाला सुरुवात

Actress Khushi Mukherjee: कारला धडकली दुसऱ्याची गाडी; अभिनेत्री फटाके विक्रेत्यावरच संतापली; भररस्त्यात अभिनेत्री मुखर्जीचा राडा

Saam Impact: धुळ्यात दूध भेसळ! साम टीव्हीच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग, FDAच्या अधिकाऱ्यांची कारवाईसाठी धावपळ|VIDEO

PM Kisan Update : पीएम किसान योजनेचे २००० रुपये खात्यात कधी जमा होणार? कोट्यवधी शेतकऱ्यांना दिवाळीत मिळाली गोड बातमी

Rupali Bhosle Photos: निळ्या पैठणी साडीमध्ये रूपालीचा मराठमोळा साज, फोटो पाहाच

SCROLL FOR NEXT