Goregaon Fire Saam tv
मुंबई/पुणे

Goregaon Fire: राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अग्नितांडव; पुलाजवळील गोडाऊनला आग, १२ अग्निबंब घटनास्थळी

Goregaon Fire Latest News: गेल्या चोवीस तासांत मुंबईच्या गोरेगाव पश्चिम भागात आगीची दुसरी घटना समोर आली आहे. गोरेगाव पश्चिममधील राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळ भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड, मुंबई

Mumbai Goregaon Fire News:

गेल्या चोवीस तासांत मुंबईच्या गोरेगाव पश्चिम भागात आगीची दुसरी घटना समोर आली आहे. गोरेगाव पश्चिममधील राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळ भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मृणालताई गोरे पुलाखाली भीषण आग लागली आहे. या परिसरातील गोडाऊनला ही आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच १२ फायर इंजिन आणि ८ टँकर घटनास्थळी पोहोचले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, दिवसभरात गोरेगावात दुसऱ्यांदा आग लागल्याची घटना घडली आहे. गोरेगावमधील राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळून ही भीषण आगीचं अग्नितांडव समोर आलं आहे. मृणालताई गोरे पुलाखाली असलेल्या अस्मी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स परिसरात आग लागली आहे.

डिझेल गोडाऊन आणि स्क्रॅप साहित्याला ही आग लागली आहे. या गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळताच १२ अग्निबंब आणि ८ टँकर घटनास्थळी पोहोचले आहेत. ही आग विझविण्याचे अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या आगीची घटना घडल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली आहे. गोडाऊनला लागलेल्या आगीचे लोट हवेत पसरले आहेत. पुलाखाली आग लागल्यानंतर काही प्रमाणात बाजूला असलेल्या रस्त्यावर वाहनकोंडी झाल्याचे दिसून येत आहे. या भीषण गोडाऊन जळून खाक झाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज्यात राजकीय भूकंप, एकनाथ शिंदेंच्या गळाला लागला बडा मोहरा; शिवसेनेची ताकद वाढणार

EPFO 3.0: आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार पीएफचे पैसे; EPFO 3.0 लवकरच होणार लाँच

Maharashtra Live News Update: राज ठाकरेंच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस जाणार

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : विघ्नहर्ता, सुखकर्ता गणरायाचं वाजतगाजत आगमन, राज्यात उत्साहाचे वातावरण

Pandharpur : शेतकरी कर्जमाफी करण्याची गणरायाने सरकारला सुबुद्धी द्यावी; जनशक्ती शेतकरी संघटनेचे विविध ठिकाणी फलक

SCROLL FOR NEXT