Mumbai Pune Expressway Accident saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway वर अपघाताचा थरार! कंटेनरचा ब्रेक फेल झाला अन् ७-८ वाहने एकमेकांना धडकली, अपघातात महिलेचा मृत्यू

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरच्या खोपोलीजवळच्या बोरघाटात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ३० ते ३५ वाहनांचे नुकसान झाले. याशिवाय एका महिलेचा मृत्यू झाला.

Yash Shirke
  • मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

  • कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानंतर वाहनांची एकमेकांना धडक

  • ३० ते ३५ वाहनांचे नुकसान, अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू, ३५ जण जखमी

सचिन कदम, साम टीव्ही, प्रतिनिधी

Mumbai-Pune Expressway News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बोगद्यामध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली होती. प्राथमिक माहितीनुसार, बोगद्यांमध्ये ७ ते ८ वाहनांची एकमेकांना धडक झाली होती. खोपोलीजवळच्या बोरघाटात हा अपघात झाला होता. अपघातात ट्रक, कार यांचे नुकसान झाले होते. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरु होते.

खोपोलीजवळच्या बोरघाटातील बोगद्यात झालेल्या अपघाताविषयी नवीन अपडेट समोर आली आहे. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, १२ ते १३ वाहने अपघात बाधित असल्याचे म्हटले जात होते. या वाहनांमध्ये कंटेनर, ट्रक, कार आणि एका खासगी बसचा समावेश होता. या अपघातात ३० ते ३५ जण जखमी झाल्याचे उघडकीस आले होते.

एका कंटेनरचा ब्रेक फेल झाला. हा कंटेनर पुढे चाललेल्या गाडीवर जाऊन धडकला, त्यानंतर मागून येणारी वाहने एकमेकांवर धडकायला सुरुवात झाली. या धडकेमुळे ३० ते ३५ वाहने अपघातग्रस्त झाल्याची नवी माहिती समोर आली आहे. कंटेनरपासून सुरु झालेली धडकेची मालिका ३ किलोमीटरपर्यंत सुरु राहिली.

बोरघाट बोगद्यामध्ये तब्बल ३ किलोमीटरपर्यंत वाहने एका मागून एक एकमेकांवर आदळत होती. यात ३५ हून जास्त वाहनांचे नुकसान झाले. यातील जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आहे. अपघातग्रस्तांपैकी एका महिलेचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. इतर जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Attraction to toxic men: मुली टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये का अडकतात? 'ही' 6 मानसिक कारणं समजून घ्या

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT