Pune Police Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: सख्खे शेजारी जीवावर उठले; विवाहितेने कंटाळून संपवलं जीवन, दोघांना अटक

Pune Crime News: शाहीन अत्तार असं ३५ वर्षीय आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune News : पुण्यातील एका विवाहित महिलेने शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारी करत असलेल्या सततच्या बदनामीला कंटाळून महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे. पोलिसांना याप्रकरणी शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीला अटक केली आहे. (Crime News)

शाहीन अत्तार असं ३५ वर्षीय आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पुण्यातील लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे कोलवाडी परिसरात शाहीन राहत होती. याप्रकरणी लोणी कंद पोलीस ठाण्यात शाहीनचे पती शौकत अत्तार यांनी फिर्याद दिली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शितल लटके आणि शाहीनमध्ये वाद होत होते. शितलने शाहीनला आपल्या नवऱ्यापासून लांब राहण्यास देखील सांगितले होते. अनेक वेळा लटके दाम्पत्याने शाहिनच्या चारित्र्यावर संशय घेत "तू मोबाईल वर कुणाशी बोलतेस हे तुझ्या नवऱ्याला सगळे सांगतो, अशी धमकी देखील दिली होती. काही दिवसांपासून यांच्यामधील वाद आणि भांडणं वाढली होती आणि अखेर या दोघांनी केलेल्या बदनामीला कंटाळून शाहीनने विष प्राशन करून आत्महत्या केली.

या प्रकरणात शाहीन यांच्या शेजारी राहत असलेल्या ज्ञानेश्वर लटके आणि त्यांची पत्नी शितल लटके या दोघांना अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

शाहीन आणि तिचे पती शौकत गेल्या अनेक दिवसांपासून कोलवाडी या भागात राहत होते. अनेक वर्षांपासून त्यांची त्यांच्या शेजारी राहत असलेल्या ज्ञानेश्वर लटके आणि शितल लटके यांच्याशी ओळख होती. लटके हा ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे तर शाहीन चे पती हे अंडे विक्रेते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0 मुळे PF आणि पेन्शनची कामे होणार अधिक सोपी; वाचा हे 7 महत्त्वाचे बदल

Tech Tips : लॅपटॉप वारंवार हँग होतोय? फॉलो करा 'या' ८ स्मार्ट ट्रिक्स

Rohit Sharma: रोहित शर्माचा निर्णय ठरला? आई-वडील पोहोचले लंडनमध्ये, लॉर्ड्सवरील वनडे ठरणार का हिटमॅनचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना?

Gold Rate Today: सलग ५ व्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार? 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Jagannath Rath Yatra : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, ३ भाविकांचा मृत्यू, २०० गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT