अश्विनी भोईर प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

नवऱ्यासह सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; मात्र, 'अद्यापही आरोपी मोकाटच का?'

महिनाभरा पेक्षा अधिक अवधी लोटला तरी पोलिसांना ते आरोपी सापडत का नाही ? आणि त्यांना अटक का केली जात नाही ? असा सवाल मृत महिलेचा भाऊ सुमित भोईर यांनी केला आहे.

प्रदीप भणगे

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण जवळील उंबर्डे गावातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उंबर्डे गावात राहणाऱ्या बिपीन कारभारी याच्यासोबत अंबरनाथच्या (Ambernath) अश्विनी भोईर हिचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर एका वर्षाच्या कालावधी नंतर घरात कौटुंबिक वाद सुरु झाले आणि त्याचा मानिसक त्रास अश्विनीला दररोज सहन करावा लागत होता. अखेर सततच्या कौटुंबिक त्रासाला (Domestic Harassment) कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली होती.

दरम्यान, तिच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्यावर खडकपाडा पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊन सुद्धा आरोपींना पोलिसांनी पकडले नाही असे मृत महिलेच्या कुटुंबियाचे मत आहे. याबाबत खडकपाडा पोलिसांना संपर्क केला असता झाला नाही. तर यातील आरोपीना तातडीने जेरबंद करण्याची मागणी मुलीच्या कुटुंबीयांनी केली आहे. (Dombivali Crime News in Marathi)             

लग्नानंतर काही काळातच अश्विनीचा तिच्या सासरच्यांकडून छळ सुरू झाला. पती बिपीन कारभारी याच्यासह सासू, दीर, नणंद आणि नणंदेचा नवरा हे सर्वजण मिळून अश्विनचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते.

या सगळ्याला कंटाळून अश्विनीनं ११ डिसेंबर २०२१ रोजी उंबर्डे गावातील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अश्विनीला दोन वर्षांची मुलगी सुद्धा असून अश्विनीच्या आत्महत्येनं तिची मुलगी पोरकी झाली आहे. दरम्यान अंबरनाथच्या कानसई गावातील मुलीने कौटुंबिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली होती. (Crime News in Marathi)

हे देखील पहा-

मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या उंबर्डे गावातील बिपीन रमेश कारभारी, गुलाब रमेश कारभारी, मयूर रमेश कारभारी , रुचिता प्रभाकर वायले आणि प्रभाकर वायले यांच्या विरोधात कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र महिनाभरा पेक्षा अधिक अवधी लोटला तरी पोलिसांना ते आरोपी सापडत का नाही ? आणि त्यांना अटक का केली जात नाही ? असा सवाल मृत महिलेचा भाऊ सुमित भोईर यांनी केला आहे. दरम्यान आरोपी सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्ष मतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे. याबाबत खडकपाडा पोलिसांना संपर्क केला असता झाला नाही. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मतदान करा पण पाडापाडी कराच; जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन

Maharashtra News Live Updates: मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं सोलापूर शहरात आगमन

Pune Politics: पुण्यातील कॅन्टोन्मेंटमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस सामना, कोण मारणार बाजी?

Stock Market Updates: ट्रम्प सरकार येताच शेअर बाजारात उसळी, टेक्नोलॉजीचे स्टॉक्सने घेतली भरारी

Maharashtra Politics: जाहिरातीवर खर्च केला नसता तर..., 'लाडकी बहीण' योजनेवरून ठाकरे गटाच्या नेत्याचा सरकारवर निशाणा

SCROLL FOR NEXT