Mumbai Local Train Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : 'तुम्ही काही रेल्वेचे जावई नाही...', फुकट्या रेल्वे प्रवाशांना मराठमोळा डोस, ६० वर्षाच्या आजीची कविताही होतेय तुफान व्हायरल

Mumbai Local Train : ‘तिकीट न काढता फुकट.. फिरायला आपण काही रेल्वेचे जावई नाहीत’, ‘पाचशे रुपयांचा दंड भरण्यापेक्षा पाच रुपयांची तिकीट काढणे यालाच मराठीत शहाणपणा म्हणतात’, अशा आशयाचे मराठी भाषेत पोस्टर हात घेऊन मुंबईतील पोस्टर बॉय चेतनने पश्चिम रेल्वेच्या ‘मेरा तिकीट मेरा इमान’ स्पर्धेत सहभागी होत फुकट्या प्रवाशांना मराठमोळा डोस दिला आहे.

Sandeep Gawade

Mumbai Local Train

‘तिकीट न काढता फुकट.. फिरायला आपण काही रेल्वेचे जावई नाहीत’, ‘पाचशे रुपयांचा दंड भरण्यापेक्षा पाच रुपयांची तिकीट काढणे यालाच मराठीत शहाणपणा म्हणतात’, अशा आशयाचे मराठी भाषेत पोस्टर हात घेऊन मुंबईतील पोस्टर बॉय चेतनने पश्चिम रेल्वेच्या ‘मेरा तिकीट मेरा इमान’ स्पर्धेत सहभागी होत फुकट्या प्रवाशांना मराठमोळा डोस दिला आहे. तसेच ६० वर्षाच्या आजीने आपल्या मराठी कवितेच्या रिल्समधून तिकीट काढून प्रवासी करण्याचा संदेश लोकांची मने जिंकली आहे. त्यामुळे पोस्टर बॉय आणि आजीचा पश्चिम रेल्वेने विशेष गौरव केला आहे.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी आणि योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी ‘मेरा तिकीट मेरा इमान’ स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा २५ डिसेंबर ते २५ जानेवारी या कालावधीत पार पडली. यात ३५० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सर्वाधिक लाइक्सच्या आधारावर पश्चिम रेल्वेकडून तीन विजेत्यांची निवड करण्यात आली. यामध्ये एंजल माहेश्वरी, भूमी सोमाणी, चेतन गुप्ता आणि हिमांशू चावला यांनी प्रथम क्रमांक पटकावला, दिनेश आणि रोहन यांनी दुसरे, तर हर्षल आणि निकिता यांनी तिसरे स्थान पटकावले. या तिन्ही विजेत्यांना पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. विशेष म्हणजे आणखी सात स्पर्धकांना त्यांच्या सर्जनशीलतेसाठी गौरविण्यात आले. या स्पर्धेत सर्वाधिक चर्चा पोस्टर बॉय चेतन गणपत कोलगे आणि ६० वर्षांच्या आजी सोनाली रेडकर यांची होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चेतनचे पोस्टर तुफान व्हायरल

चेतन हा एका खासगी कंपनी काम करत आहे. कोरोनानंतर चेतन सामाजिक विषयांवर पोस्टर लिहून ती पोस्ट हातात घेऊन सार्वजनिक ठिकाणी उभा राहतो. अनेकदा चेतनचे पोस्टर समाज माध्यमानावर तुफान व्हायरल झाले आहे. चेतनने रेल्वे स्थानक आणि धावत्या रेल्वे गाडीत पोस्टर घेऊन योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे महत्त्व मराठी भाषेत पटवून दिले आहे.

फुकट्यांवर आजीची कविता

एकशे सत्तरीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका।

कोटी कोटी जणांसाठी सदैव धावणारी मी।।

कधी नव्हता माझ्यासाठी हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, वादळ वारे।

किती आले किती गेले तरीही तटस्थ उभी राहिले मी।।

म्हणूनच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका।

रेल्वे आपली संपत्ती आहे... तिला जगवा आणि जगू द्या।।

रेल्वेच्या गौरवामुळे भारवली आजी

सोनाली रेडकर यांनी सांगितले की, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथे ग्रंथपाल या पदावरून निवृत्त झाली आहे. पूर्वीपासूनच मला कविता लिहिण्याच्या छंद होता. मात्र आजपर्यंत कोणत्याही स्पर्धेत मी सहभागी झाली नाही. नोकरीत असताना भाईंदर ते परळ दररोज प्रवास करावा लागत होता. तसेच पश्चिम रेल्वेची ही स्पर्धा बघितल्यानंतर मला या स्पर्धेत लोकल विषयी आपली कविता मांडण्याची संधी मिळाली. मी सोशल मीडियावर सक्रिय नाही. मला व्हिडिओ बनवता येत नाही. मात्र माझ्या मुलीच्या मदतीने मी व्हिडिओ रूपात माझी कविता तयार केली. मला वाटले नव्हते की माझ्या कवितेची दखल पश्चिम रेल्वे घेतील. परंतु माझ्या कवितेची दखल पश्चिम रेल्वे घेतली आणि आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT