Sushil Raheja Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईत मराठी-अमराठी वाद पेटला! ‘तुम घाटी लोग सुधरोगे नही’, प्रसिद्ध बिल्डरकडून मराठी तरुणाला मारहाण अन् शिवीगाळ

Sushil Raheja: मुंबईतील प्रसिद्ध विकासक सुशील रहेजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंडी पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांनी मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ केली होती.

Priya More

मुंबईत मराठी- अमराठीचा वाद पुन्हा पेटला. मुंबईतील प्रसिद्ध विकासकाने मराठी तरुणाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. सुशील रहेजा असं या विकासकाचे नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘तुम घाटी लोग सुधरोगे नही’, असे म्हणत या सुशील रहेजा यांनी मराठी तरुणाला मारहाण केली त्यानंतर त्याला जातीवाचक शिवीगाळ देखील केली. या प्रकरणी मुंबईतील गोवंडी पोलिस ठाण्यात तरुणाने सुशील रहेजा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रसिद्ध विकासक सुशील रहेजाविरोधात गोंवडी पोलिस ठाण्यात मारहाण आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागदपत्रावर 'स्टॅपल' व्यवस्थित न जोडल्याच्या रागातून सुशील रहेजा यांनी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रहेजा यांच्याविरोधात तक्रार करणारा तरुण त्यांच्या कार्यालयात काम करत होता. डॉ सी जी गिडवाणी रोड, रहेजा होम्स, चेंबूर येथील कार्यालयात हा तरुण शिपाई म्हणून कामाला होता.

एका कार्यालयीन मिटिंग दरम्यान कागदपत्र व्यवस्थित जुळवून न दिल्याच्या रागातून सुशील रहेजा यांनी या मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केली. तक्रारदार तरुण एका विशिष्ट समाजाचा असल्याने त्याला पुन्हा नोकरीवर राहता येऊ नये असे वर्तन कार्यालयात ठेवल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून कलम ११५ बीएनएस २०२३सह अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक अधिनियम) १९८९ अंतर्गत सुशील रहेजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे मुंबईत पु्न्हा मराठी- अमराठीचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंसोबतच्या भेटीचे फोटो समोर

High Blood Pressure : पावसाळ्यात वाढतो हाय BP चा धोका, 'या' चुका करणे आताच थांबवा

चपाती की भाकरी? काय खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते?

India vs England: टीम इंडियासाठी आज 'करो या मरो', चौथ्या टी-20 च्या प्लेईंग 11 मधून कोणाला डच्चू मिळणार?

Accident: भाविकांवर काळाचा घाला! ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT