Pune Saam
मुंबई/पुणे

Pune News: 'हिंदीमध्येच बोलणार' मुंबईनंतर पुण्यात मराठी बोलण्यावरून वाद, डीमार्टमध्ये जोरदार राडा

Marathi language debate Pune D- Mart: एअरटेल गॅलरीमध्ये तरूणीनं दाखवलेल्या मुजोरीनंतर पुण्यातील डी मार्टमध्ये असाच काहीसा प्रकार घडला. एकानं मराठी बोलण्यास नकार दिलाय.

Bhagyashree Kamble

महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलण्यास नकार दिल्याचा मुद्दा पुन्हा एकदा पेटलाय. एअरटेल गॅलरीमध्ये तरूणीनं दाखवलेल्या मुजोरीनंतर पुण्यातील डी मार्टमध्ये असाच काहीसा प्रकार घडला. एक माणूस मराठी बोलण्यास सांगत आहे. पण दुसरा व्यक्ती 'हिंदी ही बोलेंगे (आम्ही हिंदी भाषेतच बोलणार)' असे धमकावून सांगत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक माणूस आणि त्याची पत्नी डी मार्ट स्टोअरमध्ये चेकआऊटसाठी रांगेत उभे आहेत. अचानक दुसरा व्यक्ती त्याला मराठीत बोलायला सांगतो. 'हिंदी ही बोलेंगे (आम्ही हिंदी भाषेतच बोलणार)' असं तो व्यक्ती म्हणतो. तेव्हा आणखी एक व्यक्ती त्याला मराठीत बोलायला सांगतो. तेव्हा दुसरा व्यक्ती, 'नही बोलते (मी बोलणार नाही)' असं सांगतो. व्हिडिओ सोशल मिडिया पे डालो, ये गलत तरिका है, तुम्हारा.. असं तो पुढे म्हणतो.

इतरांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाचाबाचीनंतर दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. व्हिडिओ शुट करत असल्याचं पाहताच त्यानं 'बिना पुछे ये व्हिडिओ नही बना सकते' असं तो म्हणतो.

दरम्यान, हा व्हिडिओ ज्यानं शुट केला त्यानं पोस्ट केला. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. काहींनी 'महाराष्ट्रात राहता तर, मराठी बोललीच पाहिजे', अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, काहींनी 'ज्याला त्याला माहिती असलेली भाषा बोलण्याचा अधिकार आहे', अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT