Marathi Film Awards Festival 
मुंबई/पुणे

Marathi Film Awards Festival: मराठी चित्रपट सोहळ्यात राडा; CM फडणवीसांच्या भाषणावेळी घोषणाबाजी

Marathi Film Awards Festival: 'खलिद का शिवाजी' या वादग्रस्त चित्रपटावरून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान निदर्शने झाली.

Bharat Jadhav

  • 'खालिद का शिवाजी' या चित्रपटावरून महाराष्ट्र चित्रपट पुरस्कार सोहळ्यात गोंधळ

  • देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी, कार्यक्रमात खळबळ

  • हिंदू महासंघाने चित्रपटावर बंदी घालण्याची केली मागणी

  • NSCI डोमवर आयोजित कार्यक्रमात वातावरण तणावपूर्ण

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवात राडा झालाय. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी मोठी घोषणाबाजी करण्यात आलीय. 'खालिद का शिवाजी’ हा मराठी चित्रपटाच्याविरोधात घोषणा करण्यात आलीय. वरळी येथील एनएससीआय डोम येथे हीरक महोत्सवात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. यासह नामांकित राज कपूर कपूर, व्ही शांताराम, जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान केले गेले. मात्र कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी झाली.

'खालिद का शिवाजी’ या चित्रपटाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात काही वादग्रस्त मांडणी असल्याचा आरोप करत हिंदू महासंघाने चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली होती. दरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दर्शकांच्या रांगेत बसलेल्या दोघांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली. 'खालिद का शिवाजी’ या चित्रपटाच्या विरोधात त्यांनी घोषणा दिल्या. इतिहासाचे विकृतीकरण थांबवा, अशी निदर्शन करणाऱ्यांची मागणी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तासगावच्या गौरी हत्तीणीसाठी वनताराकडून 3 कोटींची आली होती ऑफर

Korlai Fort : अलिबागला गेल्यावर कोर्लई किल्ल्याची करा सफर, मुलं करतील धमाल, मजा-मस्ती

Lagnanantar Hoilach Prem : "आमच्या चौघांच्या आयुष्याचा शेवट केला तुम्ही..."; नंदिनी आत्याबाईंना थेट विचारणार जाब, पाहा VIDEO

Guruvar Upay: गुरुवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात मिसळा 'या' दोन गोष्टी; लग्नासंबंधी समस्या होतील लगेच दूर

माधुरीनंतर वनताराचा सांगलीतील गौरी हत्तीणीवर डोळा; २-३ कोटींची ऑफर, गावकऱ्यांचा विरोध पण..

SCROLL FOR NEXT