Maratha youth Question To Ajit Pawar maratha Aarakshan issue at baramati Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Aarakshan: आरक्षण कधी देता ते सांगा, अजित पवारांना मराठा तरुणांनी घेरलं; बारामतीत नेमकं काय घडलं?

Ajit Pawar on Maratha Aarakshan: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामतीत आले होते. यावेळी मराठा तरुणांनी त्यांना घेराव घातला.

Satish Daud

Ajit Pawar on Maratha Aarakshan

आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावात पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी देखील करण्यात आली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामतीत आले होते. यावेळी मराठा तरुणांनी त्यांना घेराव घातला. (Latest Marathi News)

अजित पवार यांची रविवारी बारामती तालुक्यातील पणदरे येथे जाहीर सभा पार पडली. या सभेनंतर अजित पवार यांना मराठा समाजातील (Maratha Aarakshan) तरुणांनी घेराव घातला. आरक्षण कधी देता ते सांगा असा सवाल करत मराठा तरुणांनी अजित पवार यांना आरक्षणाबाबत भूमिका विचारली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी अजित पवार (Ajit Pawar)  यांनी तरुणांना शांतपणे उत्तरे दिली. कोणत्याही समाजाला धक्का न लागता आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. आमच्या या संदर्भात बैठका होणार आहे. मराठा समाजातील १० पैकी ८ टक्के नागरिक हे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेत आहेत, असंही अजित पवार म्हणाले.

आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. मी देखील मराठा समाजात जन्माला आलो आहे. तुमच्याकडे काही पर्याय असतील किंवा चर्चा करायची असेल तर आम्ही कधीही तयार आहोत. मीही मराठ्याच्या पोटीच जन्माला आलोय, असं अजित पवार म्हणाले.

आमचा जो गरीब मराठा वर्ग आहे. ज्यांना आरक्षणाशिवाय पर्याय नाही अशा लोकांना आरक्षण द्यावं, या मताचा मी आहे. पण कुणाच्या तरी तोंडातला घास काढून तो दुसऱ्याच्या तोंडात देणं बरं नाही. आरक्षणाची मागणी करणाऱ्यांबद्दल आम्हाला अजिबात आक्षेप नाही, असं अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Road Trip: लोणावळा-खंडाळा झाले जुने; मुंबईजवळची 8 हिडन ठिकाणं पाहून थक्क व्हाल, पार्टनसोबत रोड ट्रिप करा एन्जॉय

Methi Thalipeeth: मुलांच्या नाश्त्यासाठी खरा खमंग मेथी थालीपीठ, वाचा सोपी रेसिपी

Mumbai News: मुंबईत मराठी-अमराठी वाद पेटला! ‘तुम घाटी लोग सुधरोगे नही’, प्रसिद्ध बिल्डरकडून मराठी तरुणाला मारहाण अन् शिवीगाळ

Yoga Poses For Glowing Skin: ग्लोईंग स्किनसाठी घरीच करा हे 5 योगा, नेहमीच दिसाल तरूण आणि टवटवीत

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये पंकजा मुंडेंच्या दोन सभा, हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाड झाल्याने सभेला उशीर

SCROLL FOR NEXT