Maharashtra Assembly Special Session for Maratha Reservation Saam
मुंबई/पुणे

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन? आरक्षणप्रश्नी मंत्रिमंडळाची बैठक सुरु...

Special Session for Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन? आरक्षणप्रश्नी मंत्रिमंडळाची बैठक सुरु...

Satish Kengar

>> विनय म्हात्रे

Maharashtra Assembly Special Session for Maratha Reservation:

मराठा आरक्षणावर गेल्या दोन तासांपासून मंत्रिमंडळाची बैठक सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर बैठकीत चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत.

मराठा आरक्षणावर विधेयक आणण्यावर बैठकीत मंथन सुरु असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशनही बोलावू शकतो, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आज मंत्रिमंडळाच्या या बैठकीकडे लागलं आहे. या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, पुढील मंत्रिमंडळाची बैठकही मराठवाड्यात घेण्यात येणार आहे. या बैठकीचे अध्यक्ष मंत्री सुधीर मुनगंटीवार असणार आहे. (Latest Marathi News)

या बैठकीत जे महत्वाचे निर्णय घेतले जातील, ते देखील मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली घेतले जाणार आहे. यातच मराठवाड्यातील या बैठकीत सरकारकडून मोठ्या घोषणा देखील केल्या जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यातच या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलावण्यावरही चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण मिळावं, या आपल्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. मंगळवारी सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारला आरक्षण संदर्भात निर्णय घेण्यासाठी चार दिवसांचा वेळ दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election Result : मतमोजणीआधीच 3 ठिकाणाचे निकाल समोर, ३ महिलांच्या नगराध्यक्षपदावर शिक्कामोर्तब

Mumbai : ठाण्याहून CSMT चा प्रवास सुसाट होणार, महत्त्वाचा उड्डाणपूल BMC बांधणार, वाचा कसा असेल नवा मार्ग

Maharashtra Local Body Election Results 2025 Live : तुमचा नगराध्यक्ष कोण? पालिकेवर सत्ता कुणाची? वाचा लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Cancer threat India: भारतासाठी मोठा धोका बनतोय कॅन्सर! 2040 पर्यंत रूग्णांचा आकडा 20 लाखांपर्यंत पोहोचण्याचा इशारा

Local Body Election: काय रे भाऊ! नगरपरिषद आणि नगरपंचायत यातील फरक काय?

SCROLL FOR NEXT