Maratha Reservation Latest Update Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Reservation: मराठा सर्वेक्षण ‘ॲप’मधून शेकडो गावांची नावे गायब; प्रशासनाकडे अनेक तक्रारी, कारण काय?

Maratha Community Survey: ॲपच्या माध्यमातून सध्या मराठा कुटुंबाचे सर्वेक्षण केले जात आहे. मात्र, या सर्वेक्षणात प्रशासकीय कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Satish Daud

Maratha Community Survey issue

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी मुंबईत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यानंतर राज्य सरकारने प्रशासकीय अधिकाऱ्यांना मराठा समाजाचे तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, सध्या संपूर्ण राज्यात सर्वेक्षणाचं काम सुरू आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटकडून सर्वेक्षण ॲप देखील तयार करून घेतलं आहे. त्या ॲपच्या माध्यमातून सध्या मराठा कुटुंबाचे सर्वेक्षण केले जात आहे. मात्र, या सर्वेक्षणात प्रशासकीय कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच ॲपमधून अनेक गावेही गायब असल्याचं समोर आलं आहे.

सर्वेक्षण करताना सर्व्हर डाऊन होणे, ॲपमुळे बॅटरी उतरणे, काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडत आहे. दरम्यान, या ॲपमध्ये नागपूर, जालना, धुळे, लातूर, पुणे या महत्त्वाच्या जिल्ह्यातील गावांसह मराठवाडा तसेच विदर्भातील काही गावांची नावेच नसल्याचे समोर आले आहे.

यामुळे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील १०० गावांची नावे ॲप मधून गायब आहे. या तक्रारी आल्यानंतर या तक्रारींची गंभीर दखल महसूल विभागाने घेतली आहे.

या ॲपमधील तांत्रिक त्रुटी तसेच गायब झालेल्या गावांच्या नावासह नगरपालिकांची समाविष्ट नसलेली नावे तातडीने समाविष्ट करावीत, असे आदेश राज्याचे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी गोखले इन्स्टिट्यूटला दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT