Maratha Reservation Don't give OBC certificate to Maratha community OBC Federation warns eknath shinde devendra fadnavis government Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Reservation: मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिल्यास देशभरात आंदोलनं करू; ओबीसी महासंघाचा सरकारला इशारा

Maratha vs OBC Clash: ‘मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही’ असा आक्रमक पवित्रा ओबीसी संघटनांनी घेतला आहे.

Satish Daud

Maratha Reservation Latest Marathi Updates: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील गेल्या ९ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. जरांगे यांनी अन्न पाण्याचा त्याग केला असून जोपर्यंत मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. अशातच ओबीसी संघटनांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

मराठवाडय़ातील मराठ्यांना विदर्भाच्या धरतीवर  कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने समिती नेमली असताना याला ओबीसी संघटनांकडून तीव्र विरोध केला जात आहे. ‘मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही’ असा आक्रमक पवित्रा ओबीसी संघटनांनी घेतला आहे.

त्यामुळे जालन्यात सुरू झालेल्या मराठा आरक्षणाच्या वादाला कुणबी विरुद्ध मराठा असे स्वरुप येऊ लागले आहे. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली गावात उपोषण सुरू केलं आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जरांगे यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारचं टेन्शन वाढत चाललंय. त्यातच सरकारने दबावात येऊन मराठ्यांना ओबीसींचं प्रमाणपत्र दिल्यास आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

मराठ्यांना ओबीसींचं प्रमाणपत्र दिल्यास मराठा समाजापेक्षाही देशभरात मोठं आंदोलन सुरू करू, असा इशाराही बबनराव तायवाडे यांनी राज्य सरकारला दिला आहे. एकीकडे मराठा समाज आणि दुसरीकडे ओबींसी दिलेला इशारा यावरून राज्य सरकारची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची खास योजना! ५ वर्षात मिळणार ३५ लाख रुपये; कसं? जाणून घ्या

Yavtmal Crime : यवतमाळमध्ये फुटबॉल खेळण्यावरून वाद, बंदुकीतून तीन फायर, तरुण गंभीर जखमी

Maharashtra Politics: दिल्ली दौऱ्यानंतर ठाकरेंची युती निश्चित? ठाकरेंच्या युतीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Live News Update: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर

Chanakya Niti : वाईट काळात कोणते कसे लोक मदत करतात?

SCROLL FOR NEXT