Maratha Aarakshan Protest Saam Tv
मुंबई/पुणे

Maratha Aarakshan: आरक्षण घेऊनच जाणार, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही; आझाद मैदानावर मराठा आंदोलक आक्रमक| VIDEO

Maratha Aarakshan Protest: आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. ते उपोषणाला बसणार आहेत. याठिकाणी आलेल्या आंदोलकांनी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा इशारा दिला.

Priya More

Summary -

  • आझाद मैदानावर मराठा बांधवांची प्रचंड गर्दी.

  • मनोज जरांगे १० वाजता उपोषणाला सुरुवात करणार.

  • आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही, आंदोलकांचा इशारा.

  • मुख्यमंत्री आणि सरकारवर आंदोलकांचा थेट इशारा.

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. थोड्याच वेळात ते आझाद मैदानावर पोहचणार आहेत. २००० पेक्षा जास्त वाहनांचा ताफा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईमध्ये दाखल झाला आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदान परिसरात मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे. संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे. मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.

आझाद मैदानावर राज्यभरातून मोठ्यासंख्येने मराठा बांधव आले आहेत. 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणाबाजी केल्या जात आहेत. या आंदोलकांनी संतप्त प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारला देखील इशारा दिला आहे.

एका मराठा आंदोलकाने आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असे सांगितले. ते म्हणाले की, 'जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणारच नाही. अजून जर दादा म्हणाले आणखी जणांना गोळा करत आम्ही आमच्या घरच्या लहान मुलांपासून ते सर्वांना घेऊन येऊ. मुंबई जाम करणार म्हणजे करणारच आणि आरक्षण घेऊन जाणारच.'

दुसऱ्या आंदोलकाने संतप्त प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला. ते म्हणाले की, 'मनोज जरांगेच्या माध्यमातून शासनाला एकच सूचना आहे. याठिकाणी आलेले सर्व मराठे आरक्षण घेतल्याशिवाय एकही मराठा मुंबई सोडणार नाही. मुंबईमध्ये येऊन देणार असे फडणवीस म्हणाले होते. तर त्यांना एकच सांगणं आम्ही येणार, आरक्षण घेणार आणि तेव्हाच जाणार.'

तर आणखी एका आंदोलकाने सांगितले की, 'आम्ही शांततेत आलो आहोत. उद्रेक नको बाबा. आम्ही शांततेत मुंबईत आहोत. अचानक जर मुख्यमंत्र्यांनी हालचाल नाही केली आणि आरक्षणाची पुकार नाही केली. तर मनोजदादांचा आदेश आला तर तुमची मुंबई राहणार नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka Water: माठात ही १ सिक्रेट गोष्ट ठेवा, पाणी फ्रिजपेक्षा होईल थंडगार

मुंबईत सकाळ समूहाच्या माध्यमातून यिन मिनिस्ट्री 2026 अधिवेशन उत्साहात|VIDEO

Salman Khan : 'मातृभूमी'नंतर भाईजानचा आणखी एक धमाका; नव्या चित्रपटाची घोषणा, पहिला फोटो आला समोर

Eknath Khadse: शरद पवार गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: . भारत सरकारकडे पुरेसा गॅस, इंधनसाठा उपलब्ध – छगन भुजबळ

SCROLL FOR NEXT