अनेक खासगी शाळा दर्जाहीन- बच्चू कडू ...(पहा व्हिडीओ) Saam Tv
मुंबई/पुणे

अनेक खासगी शाळा दर्जाहीन- बच्चू कडू ...(पहा व्हिडीओ)

शाळा, विद्यार्थ्यांचं भविष्य आणि राजकारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शाळा सुरु होणार की नाही होणार, अकरावी प्रवेशाबाबत काय? विद्यार्थ्यांची शाळा कधी सुरु होणार अशी अनेख प्रश्नांची चर्चेत आहेत. शासनाकडून याबाबत वेगवेगळी GR आणि वेगळे निर्णय समोर येताना दिसत आहेत. कारण गेल्या ३ निर्णयापासून घोळ दिसून येतोय, पहिल्यांदा फी कपातीचा निर्णय घेण्यात आला पण नंतर मागे घेण्यात आला. अधिसूचना काढायची होती तेव्हा GR काढला गेला. तसेच शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय असेल त्यातही तो मागे घेतला गेला. 11 वी CET बाबत न्यायालयाने दणका दिल्यावर तो मागे घेण्यात आला. मग हे निर्णय घेण्यापूर्वी राज्य शासन कोणत्या स्वरूपाचा अभ्यास करत आहे? यावर शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू-

कोरोनाच्या जंतूला शाळेचं काय वावडं आहे, कारण शाळेतच कोरोना फैलावतो राज्य सरकारचा समज आहे का ?

-शासनाने एखादी गोष्ट सुरु केली तर त्याचे जबाबदार हे सरकारच असते मंदिर सुरु केलं तर पुजारीला कोणी काही म्हणत नाही, इतर सभा झाल्या त्यांच्यावर कोण आरोप करत नाही. पण आता शासनाने निर्णय घेतला मग शासनाला समजलं नाही का? शासनाने अभ्यास केला होता की नाही. बाकी सुरु केलं पण शाळा महत्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांचं काही नुकसान झालं तर शासनाने मात्र न अभ्यास करताच सुरु केलं. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचारकरून तो निर्णय घेतला जातो. हे 3 पक्ष सरकार आहे. त्यामुळे यात प्रत्येकाचं मत वेगवेगळं असणारच आहे.

असुविधांबाबत पत्रव्यवहार होऊनही दखल घेतली जात नाही-

-गेल्या 50 वर्षांपासून काही संस्थांनी फक्त याच्यावर धंदा केला आहे. याबाबत पालकांच्या पाठीशी आहे. तसेच शिक्षण शुक्ल अधिनियमामध्ये बदल करण्यासाठी माझ्याकडून सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे. शिक्षण शुक्ल अधिनियमामध्ये बदल करण गरजेचं आहे. सावित्रीबाईंनी स्वतःच्या घरात शाळा सुरु केली. परंतु आता त्यात बदल होऊन शिक्षणाचं दार फक्त पैसेवाल्यांसाठीच उघडं का अशी व्यवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे आत्ताच्या लुटारू संस्थाबाबत माझी भूमिका ठाम राहील. लुटारू संस्थे विरोधात कारवाई होणार. नागपूरच्या 15 शाळांबाबत ऑडिट मध्ये 70 कोटींची रिकव्हरी निघाली आहे.

सगळ्या शाळा नफेखोरी करतात असेही नाही

-आपण हे लक्षात घेतलं पाहिजे , जे प्रायव्हेट शाळेत शिकतात हेच पोर हुशार असा भ्रम काढून टाकणं गरजेचं आहे. अनेक खासगी शाळा दर्जहीन आहेत. सरकारी शाळा चांगल्या नाहीत हा गैरसमज आहे. पालकांनी शाळांबद्दलचा गैरसमज दूर करण गरजेचं आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT