Shivraj Singh Chouhan And Eknath Shinde Saam TV News
मुंबई/पुणे

Shivraj Singh Chouhan: महाराष्ट्रातील अनेक उद्योगांनी मध्यप्रदेशात येण्याचं आश्वासन दिलं; CM चौहान यांचा मोठा दावा

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Shivraj Singh Chouhan News: मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे महाराष्ट्रात येणार आहेत. महाराष्ट्रातील उद्योजकांना मध्य प्रदेशात नेण्यासाठी चौहान (Shivraj Singh Chouhan) हे इनवेस्ट इन मध्यप्रदेश या उपक्रमाद्वारे उद्योजकांना आकर्षित करणार आहेत. याबाबत शिवराजसिंह चौहान आणि भाजपवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या टीकेला आता मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (CM Shivraj Singh Chouhan On Invest In MP)

वेदांता फॉक्सकॉनसारखा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात राज्यात गेला. यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका झाली आणि राजकारणही तापलं. महाराष्ट्रातला मोठा प्रकल्प गुजरात राज्यात गेल्याने राज्याचं मोठं नुकसान झालंय. अशात आता महाराष्ट्रातल्या उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी इतर राज्यांनीही जोर लावल्याचं दिसतंय. याचं कारण म्हणजे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) हे येत्या शुक्रवारी पुण्यात येणार आहेत. मध्यप्रदेश राज्यात उद्योगधंदे वाढावेत यासाठी ते महाराष्ट्रातील उद्योजकांना त्यांच्या राज्यात म्हणजेच मध्य प्रदेशात येण्याचं आवाहन करणार आहेत. मात्र, यामुळे त्यांच्यावर आणि भाजपवर मविआकडून जोरदार टीका होत आहे. याला चौहान यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले शिवराजसिंह चौहान?

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde) मी मध्यप्रदेशमध्ये आमंत्रित करतो. त्यांनी यावं आणि तिकडच्या (मध्य प्रदेशच्या) उद्योगपतींना भेटावं आणि चर्चा करावी असं म्हणत या देशात कुणीही कुठेही जाऊ शकतो असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच, महाराष्ट्राच्या अनेक उद्योगांनी मध्यप्रदेशमध्ये येण्याचं आश्वासन दिलं आहे असा मोठा दावा त्यांनी केला आहे.

महाराष्ट्राच्या उद्योगमंत्र्यांचं स्पष्टीकरण

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन उद्योजकांना खुणावत असताना शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवण्याचा हा घाट असल्याचा आरोप मविआ नेते करत आहेत. याबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

यावेळी सामंत म्हणाले की, इतर राज्यातील मुख्यमंत्री आले म्हणजे ते रोजगार पळवण्यासाठी आले आहेत, असे नाही. वेदांता निघून गेली म्हणून खूप आरोप प्रत्यारोप झाले. मात्र, मागील १४ महिन्यांपासून ही बैठक झाली नव्हती. त्यामुळे मी तेच बोलत राहिलो तर काम होणार नाही. देशात नवीन उद्योग येण्यासाठी महाराष्ट्रातील पॉलिसी सर्वात चांगली आहे, मात्र त्याचं व्यवस्थित प्रेझेंटेशन झालं पाहिजे, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

Invest In MP ची पुण्यात परिषद

पुण्यातील (Pune) आणि एकंदरीतच महाराष्ट्रातील उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान पुण्यात येणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मध्यप्रदेशचे उद्योग मंत्री, आयएएस अधिकारी आणि मुख्यमंत्री असे सर्वजण Invest In MP या परिषदेला उपस्थित असणार आहेत. यानिमित्ताने आता पुन्हा महाराष्ट्रातील उद्योगाला, गुंतवणुकीसाठी मध्यप्रदेशची दिशा मिळणार का अशी शंका निर्माण झाली आहे. (Session on 'Investment Opportunities in Madhya Pradesh')

उद्योजकांसाठी पुणे हे आवडतं शहर

मुंबईनंतर उद्योजकांना पुणे हे शहर खुणावतं. याचं कारण म्हणजे, पुण्यात किर्लोस्कर, फोक्सवॅगन, टाटा, महिंद्रा, बजाज या ऑटो उद्योगांबरोबरच आयटी क्षेत्रातलेसुद्धा नावाजलेले उद्योग आहेत. आयटीमधील इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा यांसारख्या नावाजलेल्या विविध कंपन्या पुण्यात आहेत. त्याचबरोबर पुण्यात शिक्षण संस्था, पाणी, वीज, रस्ते आणि सुशिक्षित कर्मचाऱ्यांची उपलब्धता असल्यामुळे पुणे शहर नेहमीच इतर उद्योजकांना गुंतवणुकीसाठी खुणावत असतं. त्यामुळे आता येथील उद्योजकांना मध्यप्रदेशात आपला व्यवसाय स्थापन करण्यासाठी आवाहन करण्यात येण्याची शक्यता आहे.  (Maharashtra News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

SCROLL FOR NEXT