Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest  Saam Tv
मुंबई/पुणे

Manoj Jarange : "आमची फसवणूक होतेय हे कळतंय" मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, पहा Video

Manoj Jarange Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. कुणबी नोंदींच्या आधारे आरक्षण देण्याची मागणी करत त्यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे.

Alisha Khedekar

मराठा समाजाला कुणबी नोंदींच्या आधारे आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच आता मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. येत्या २९ ऑगस्ट रोजी अनेक मराठा बांधवांना घेऊन मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत.

मराठा समन्वयक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी मुंबईतील आझाद मैदानाची पाहणी केली. आंदोलनासाठी येथे परवानगी मागण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जात असल्याचे बोलले जात आहे. या आंदोलनापूर्वी सरकारच्या मंत्री मंडळातील ३ मंत्री आणि १ आमदार आज जरांगे यांच्या भेटीला गेले होते.

दरम्यान जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, “आम्ही राज्यघटनेच्या बाहेर जाऊन काहीही मागत नाही. कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यानुसार आरक्षण द्यावे,” अशी त्यांची मागणी आहे. गॅझेट रोखता येणार नाही आणि उपलब्ध नोंदींच्या आधारे मराठा समाजाला न्याय मिळावा, अशी भूमिका त्यांनी घेतली. दरम्यान, सरकार आमची फसवणूक करत असून आपण आंदोलनावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. “२९ ऑगस्टला उपोषण करणारच, सरकारला वेळ वाढवून देणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Gain Reasons: डाएट आणि एक्सरसाइज करूनही वजन वाढतंय? 'या' ७ चुका तुमचा प्रयत्न करू शकतात फेल

Central Railway News : दुष्काळात तेरावा महिना! मेगा ब्लॉक सुटल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल सेवा ४५ मिनिटे उशिराने

Maharashtra News Live Update: Mumbai: पुण्यात मराठा बिझनेस कम्युनिटीचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो

Papaya vs Watermelon: पपई की कलिंगड? वजन, पचन आणि इम्युनिटीसाठी कोणतं फळ ठरेल बेस्ट

अजब कारभार! ६० वर्षांनंतर कल्याणमधील पद्मिनी प्रीमिअरची होणार SIT चौकशी, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT