Manoj Jarange Health Update Saam TV
मुंबई/पुणे

Manoj Jarange Health: मोठी बातमी! नवी मुंबईत येताच मनोज जरांगेंची तब्येत बिघडली; पायाला सूज, तापही भरला

Satish Daud

Manoj Jarange Health Update

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले आहेत. नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटमध्ये शुक्रवारी (२६ जानेवारी) पहाटे मराठा समाजाची पदयात्रा पोहचली आहे. दरम्यान, नवी मुंबईत दाखल होताच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

पदयात्रेमुळे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या पायाला सूज आली असून सकाळपासूनच त्यांना ताप भरला आहे. त्यामुळे जरांगे यांची माथाडी भवन येथे होणारी जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे. सध्या जरांगे हे हे एपीएमसी मार्केटमधील प्रशासकीय इमारतीमध्ये आराम करीत आहेत. (Latest Marathi News)

सकाळी ९ वाजेनंतर ते वाशी येथील शिवाजी चौकात येणार असून तिथे जाहीर सभा घेणार आहेत. या सभेनंतर ते आझाद मैदानाच्या दिशेने कूच करणार आहे. यादरम्यान राज्य सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा जरांगे यांच्या भेटीसाठी येणार आहे. गुरुवारी देखील सरकारच्या शिष्टमंडळाने लोणावळा येथे जरांगे यांची भेट घेतली होती.

मात्र, या भेटीत मराठा आंदोलनावर कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे मुंबईत येऊन मराठा आरक्षण घेणारच असं जरांगे यांनी ठामपणे सांगितलं आहे. सध्या जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील मराठा बांधव नवी मुंबईत दाखल होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील होत आहे.

हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या मराठा आंदोलकांमुळे रस्ते जाम झालेत. ही बाब सरकारसाठी मोटी डोकेदुखी ठरत आहे. दुसरीकडे आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची क्षमता कमी असल्याचं नवी मुंबई पोलिसांनी म्हटलंय. मराठा आंदोलकांनी नवी मुंबईतील खारघर येथे थांबावं अशी विनंती पोलिसांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT