Manoj Jarange Patil Future CM Posters  Saam TV
मुंबई/पुणे

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री; पुण्यातील शांतता रॅलीत झळकले बॅनर्स

Manoj Jarange Patil Future CM Posters : मनोज जरांगे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे फलक घेऊन काही मराठा बांधव पुण्यातील शांतता रॅलीत सहभागी झाले आहेत. या पोस्टर्सची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे.

Satish Daud

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते सध्या ठिकठिकाणी दौरा करत उमेदवारांची चाचपणी करीत आहेत.

लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे देखील विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचा दौरा करत आहेत. दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात शांतता रॅली काढली आहे.

जरांगे यांनी शांतता रॅलीला पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात केली आहे. आज त्यांची रॅली पुणे शहरात आली असून या रॅलीला लाखो मराठा बांधवांनी गर्दी केली आहे. सारस बाग येथून या रॅलीला सुरुवात होणार असून गरवारे पूल छत्रपती संभाजी पुतळा येथे या रॅलीची सांगता होणार आहे.

मनोज जरांगे भावी मुख्यमंत्री

दरम्यान, या शांतता रॅलीत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर्स झळकले आहेत. काही मराठा बांधव मनोज जरांगे भावी मुख्यमंत्री असे फलक घेऊन रॅलीत सहभागी झाले आहेत. या पोस्टर्सची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे.

मनोज जरांगे विधानसभेची निवडणूक लढणार?

मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. या मागणीसाठी त्यांनी महाराष्ट्रात शांतता रॅली देखील काढली आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केला नाहीत, तर विधानसभेला तुमचे सर्व आमदार पाडणार, असा इशाराही मनोज जरांगे यांनी महायुतीला दिलाय.

२९ ऑगस्टला अंतरवली सराटीत होणार बैठक

इतकंच नाही, तर विधानसभेत मराठा उमेदवार उभे करणार, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. येत्या २९ ऑगस्टला जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात यासंदर्भात मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक होणार आहे. निवडणूक लढवण्याबाबत निर्णय झाल्यास गरीब आणि गरजवंत मराठा हे अपक्ष म्हणूनच मैदानात उतरतील, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

मी कुठलाही पक्ष काढणार नाही. कारण मला राजकारणात यायचे नाही. आमच्या मागण्या मान्य करा, मी राजकारणात पडणार नाही, असं मनोज जरांगे पाटील राज्य सरकारला वारंवार सांगत आहेत. विधानसभेच्या जागा लढवायच्या ठरवल्यास सामान्य मराठा अपक्ष म्हणूनच लढतील, असंही जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे ४००० मतांनी आघाडीवर

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT